Latest Maharashtra News Updates : हैद्राबाद महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात
esakal September 04, 2025 01:45 PM
Solapur Live: हैद्राबाद महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात

हैद्राबाद महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ दुर्घटना घडली. बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या बसला ट्रकने जबरदस्त धडक दिली. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहेत, त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. यातील सर्व प्रवाश्यांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत.

जीआर विरोधात ओबीसी समाज कोर्टात जाणार

मराठा आरक्षणास मान्यता मिळाल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक. जीआर विरोधात कोर्टात जाणार निर्णय.

Ekanth Shinde Live : ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची नाराजी दूर करणार - एकनाथ शिंदे

ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. भुजबळ नाराज असतील, तर त्यांना समजावून सांगू. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Sangli Live : आगामी सांगली महापालिका निवडणुका ताकतीने लढवली जाईल - आमदार विश्वजित कदम

आगामी सांगली महापालिका निवडणुक ताकतीने लढवली जाईल,असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी सांगलीमध्ये बैठक घेतली आहे.काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागावे,असं आवाहन आमदार विश्वजीत कदम यांनी केले आहे.

Solapur Live : आगामी महापालिका निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध

- आगामी महापालिका निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध

- 2017 च्या महापालिका निवडणुकांची प्रभाग रचनाप्रमाणेच यंदाही सादरीकरण

- महापालिकेच्या कौन्सिल हॉल परिसरात सर्व प्रभागांचे लावण्यात आले स्वतंत्र नकाशे

- प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे आणि हद्द पाहण्यासाठी भावी नगरसेवकांनी केली गर्दी

- 2011 च्या लोकसंख्येप्रमाणे तर 2017 च्या पद्धतीने प्रारूप प्रभाग रचना जाहीर

- प्रभाकर रचनेमध्ये मतदारांची संख्या मात्र जुलै 2025 अखेर पर्यंत निश्चित

Live: २०२५-२६ कापसासाठी किमान किंमत आणि ५५० खरेदी केंद्रांचा आढावा

केंद्रीय मंत्री यांनी २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी कापसाच्या किमान आधारभूत किंमतीच्या कामकाजाच्या तयारीचा आढावा घेतला. पहिल्यांदाच, खरेदी केंद्रांच्या कामकाजासाठी निकष अधिसूचित केले; कापूस उत्पादक राज्यांमध्ये विक्रमी ५५० केंद्रे प्रस्तावित.

Live: गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्यांना परतीचे वेध

गणेशोत्सवासाठी आपल्या गावी आलेल्या कोकण वासियांना पुन्हा मुंबईत परतायचे वेध लागलेत. त्यांच्या परतीच्या प्रवासात गैरसोय होऊ नये यासाठी एसटीच्या रायगड विभागाने जादा बसेसची व्यवस्था केली आहे.

मुंबई, ठाणे आणि उपनगरांसाठी आज 3 सप्टेंबर रोजी 525 तर उद्या 4 सप्टेंबरला 125 जादा गाड्या रायगडमधील आठ आगारातून सोडण्यात येणार आहेत.

शिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यात येतील असे एसटी तर्फे सांगण्यात आले.

Live: अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून झाली सुटका

अंडरवर्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून झाली सुटका

- मागच्या गेटने पोलिसांनी मीडिया पासून लपवत केली अरुण गवळी यांची सुटका.

- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली,

- सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका झाली आहे....

- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे...

- अरुण गवळीला मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.....

- सर्वोच्च न्यायालयाने अरुण गवळीला जामीन मंजूर केला असून थोड्या वेळात नागपूर मध्यवर्ती कारागृहातुन सुटका झाली.

Ramdas Athawale LiveUpdate: "मला फक्त एवढेच सांगायचे आहे की शुल्क लादणे ही चांगली गोष्ट नाही"- राम दास आठवले

अमेरिकेने भारतावर लादलेल्या शुल्कांवर आणि विरोधकांकडून भारतीय व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यावर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणतात, "मला फक्त एवढेच सांगायचे आहे की शुल्क लादणे ही चांगली गोष्ट नाही."

Maratha Aarakshan LiveUpdate: मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक होताना दिसत आहे. नांदेड मध्ये ओबीसी समाजाने शासनाने काढलेल्या जीआरची होळी केलीये.नांदेडच्या भोकर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने हे आंदोलन केले.शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाला होता.राज्य शासनाने मराठा समाजाबद्दल घेतलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयाविरोधात ओबीसी समाज राज्यभरात तीव्र लढा उभा करणार असा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे.

Chhagan Bhujbal LiveUpdate: छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला मारली दांडी

आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबळ यांची अनुपस्थिति आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला भुजबळ उपस्थित होते. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे भुजबळ नाराज होते. त्यात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला भुजबळ अनुपस्थित आहेत, त्यामुळे चर्चा सुरू आहे.

Manoj Jarange patil Live: सर्व मराठे अरक्षणात जाणार म्हणजे जाणार - मनोज जरांगे पाटील

सर्व मराठे अरक्षणात जाणार म्हणजे जाणार

मराठ्यांनी जिवाची बाजी लावून यश पदरात पाडून घेतल

हक्काच गॅझेट असून एक ओळ माराठ्यांसाठी लिहिली न्हवती

_ मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange patil Live : मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणावर पत्रकार परिषद

मनोज जरांगे पाटील लवकरच पत्रकार परिषद घेणार असून, मराठा आरक्षणाविषयी आपले मत मांडणार आहेत.

OBC Agitation Live : सरकारच्या जीआरवरुन ओबीसी नेत्यामंध्ये मतभेद

सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन ओबीसी नेत्यामंध्ये मतभेद आहेत, सरकारच्या निर्णयावर तायवाडे यांनी समाधानी असल्याचे म्हटले आहे तर लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे की, सरकारने ओबीसींच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला आहे.

Sanjay Raut Live : मनोज जरांगेंचे समाधान झाले असेल तर आमचंही समाधान- संजय राऊत

मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणाबाबत समाधान झाले असेल तर आमचेही समाधान झाले आहे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Delhi Live : हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा जनता दरबार

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर काही दिवसांपूर्वी जनता दरबारात हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी गुजरातमधील हल्लेखोराला अटक केली. मुख्यमंत्र्यांनी आता काही दिवसांनी पुन्हा निवासस्थानी जनता दरबार घेतला आहे.

Parbhani News Live : येलदरी प्रकल्पाचे ६ दरवाजे पुन्हा उघडले

मराठवाड्यातील दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या परभणीच्या येलदरी धरणाचे पुन्हा एकदा १० पैकी ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.६ दरवाज्यांमधून १२६६० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीपात्रात सोडण्यात आलाय त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.धरण क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि खडकपुर्णा धरणातील विसर्गामुळे येलदरी तून पाण्याचा विसर्ग केला जातोय जर पाऊस वाढला तर विसर्ग ही वाढवण्यात येवू शकतो.

Delhi Rain : दिल्लीत मुसळधार पाऊस, यमुना नदीने धोका पातळी ओलांडली

दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. सध्या पाणी धोका पातळीच्या वर असून अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे काही भागात धोक्याचा इशारा देण्यात आलाय.

Solapur News Live : कुर्डुवाडीत गणेश विसर्जनाला डीजे न लावण्याची शपथ

पंढरपूर जवळच्या कुर्डुवाडी शहरातील गणेश तरुण मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे न लावण्याचा आगवेळा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पोलिसांच्या उपस्थितीमध्ये संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तशी शपथ घेतली आहे. डीजेमुळे ध्वनी प्रदुषण वाढले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे न लावण्याचा महत्व पूर्ण निर्णय घेतला आहे.अशा प्रकारचा निर्णय घेणारे हे मंडळ सोलापूर जिल्ह्यात पहिले ठरले आहे.

Solapur : पोलीस प्रशिक्षण केंद्रात १७० जणांना विषबाधा

Solapur: सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झालीय. विषबाधा झालेल्यांपैकी 17 जणांवर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रशिक्षणार्थी पोलीसांना अन्नातून ही विषबाधा झाली असल्याची माहिती समजते. सर्व बाधित प्रशिक्षणार्थींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळपास 1400 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. दरम्यान काल सायंकाळच्या सत्रात या प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब, मळमळ याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर जवळपास 170 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Deepak Mittal : संयुक्त अरब अमिरातीमधील भारताचे नवे राजदूत म्हणून दीपक मित्तल यांची नियुक्ती

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीमधील भारताचे नवे राजदूत म्हणून दीपक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्तल हे भारतीय परराष्ट्र सेवेतील १९९८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. सध्या ते पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. मित्तल यांनी कतारमध्येही राजदूत म्हणून काम पाहिले असून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या देशांशी संबंधित घडामोडींमध्येही त्यांनी काम केले आहे.

Manoj Jarange-Patil News : मनोज जरांगे-पाटील संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

मुंबईमधून निघाल्यानंतर जरांगे पाटील थेट संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांच्यावर गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री जरांगे पाटील यांचे मराठा समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आले. रुग्णालयाबाहेर मराठा तरुणांची स्वागतासाठी मोठी गर्दी होती. मध्यरात्री तरुणांकडून फटाके फोडत पाटलांचे स्वागत करण्यात आले.

Belgaum News : 'जय किसान'च्या सुनावणीला 'बुडा'च्या वकिलांची दांडी

बेळगाव : लॅंड यूज रद्द करण्याच्या बेळगाव नगर विकास प्राधिकरण (बुडा) प्रशासनाच्या आदेशाला स्थगिती देण्याची जय किसान भाजी मार्केटची मागणी मंगळवारी (ता. २) उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने फेटाळली. या याचिकेवरील पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली. या दाव्यावरील सुनावणीला मंगळवारी ‘बुडा’चे वकील हजर राहिले नाहीत.

Vidarbha Rain : विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, अमरावतीला ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात जोरदार पावसाची परिस्थिती तयार झालीये. काल (मंगळवार) विदर्भात पावसाने (Vidarbha Rain Alert) जोरदार हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट (Amravati Orange Alert), तर उर्वरित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Kolhapur Rain : पंचगंगेची पाणीपातळी दोन फुटांनी वाढली; राधानगरी धरणातून ४३५६ क्युसेक विसर्ग सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यात आज संततधार पाऊस कोसळला, तर धरणक्षेत्रात मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे राधानगरी धरणाचा क्रमांक-६ हा दुसरा स्वयंचलित दरवाजाही खुला होऊन त्यामधून ४३५६ क्युसेक विसर्ग सुरू राहिला. परिणामी, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दिवसभरात दोन फुटांनी वाढ झाली. रात्री ही पातळी २३ फूट चार इंच इतकी होती. जिल्ह्यात पावसाची मंगळवारी पहाटे पुन्हा जोरदार सुरुवात झाली. यामध्ये धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाण पाऊस पडला. यामुळे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक-६ उघडून त्यातून मोठ्या प्रमाणात नदी पात्रात विसर्ग सुरू राहिला. यापूर्वी क्रमांक-३ हा दरवाजा खुला झाला आहे.

Kolhapur News : कोल्हापुरात प्रारूप प्रभागरचना आज होणार जाहीर, रणांगणातील अनेकांची दिशा ठरणार

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी असलेल्या इच्छुकांबरोबरच सर्व पक्षांचे लक्ष लागलेली प्रारूप प्रभागरचना आज (ता. ३) प्रसिद्ध केली जाणार आहे. यामधून कुणाचा प्रभाग तुटला, कुणाकडे जास्त आला, हक्काचे मतदार गेले का, कोणत्या रिंगणातून कोण उतरणार की थांबणार, नवीन कोणाला संधी मिळणार या साऱ्यांची प्राथमिक उत्तरे मिळणार आहेत. मुख्य इमारतीमधील स्थायी समिती सभागृहात प्रारूप प्रभागरचना पाहण्यासाठी उपलब्ध होणार असून, त्यावर १५ सप्टेंबरपर्यंत हरकती, सूचना नोंदवायच्या आहेत.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतच्या प्रमुख मागण्या राज्य सरकारकडून मंजूर

Latest Marathi Live Updates 3 September 2025 : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या प्रमुख मागण्या राज्य सरकारकडून मंजूर करवून घेत मुंबईत भगवा झेंडा फडकवला. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यात असलेले अडथळे दूर करण्यासाठी हैदराबाद आणि सातारा गॅझेट (तत्त्वतः मान्य) लागू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. तसेच बिहारमधील ‘व्होटर अधिकार’ यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातुःश्रींबद्दल आक्षेपार्ह भाषेत विधान केल्याप्रकरणी पंतप्रधानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी पुढील तपासावरील देखरेख थांबविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी असलेल्या इच्छुकांबरोबरच सर्व पक्षांचे लक्ष लागलेली प्रारूप प्रभागरचना आज प्रसिद्ध केली जाणार आहे. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) आमदार के. कविता यांची मंगळवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.