1 एप्रिल २०२५ मध्ये शांती प्रियाने तिचा टक्कल लूक शेअर करत चाहत्यांना धक्का दिला.
2 एका मुलाखतीत तिने प्रसिद्धीसाठी नव्हे तर स्वतःचा प्रयोग म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
3 या लूकमध्ये तिने दिवंगत पती सिद्धार्थ रॉय यांचा ब्लेझर घालून भावनिक आठवण जपली.
अभिनेत्री शांती प्रियाने काही दिवसापूर्वी संपुर्ण केस कापलेले फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. तिने प्रसिद्धसाठी हा निर्णय घेतल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं. दरम्यान नुकतंच तिच्या डोक्यावरचे संपुर्ण केस कापण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. एप्रिल २०२५ मध्ये तिने तिचा एक वेगळा आणि बिनधास्त लूक सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या लूकमुळे ती बरीच चर्चेत आली होती. आता एका मुलाखतीत तिने या गोष्टींचा खुलासा केला आहे.
झूमला दिलेल्या मुलाखतीत शांती प्रियाने सांगितलं की, 'अनेक लोक तिला विचारत होते की तिने हा बोल्ड लूक का निवडला? यावर तिने म्हटलं की, 'जर मला केवळ प्रसिद्धी मिळवायची असती तर मी असे अनेक मार्ग निवडू शकले असते. मात्र, मी स्वतःवर असा प्रयोग केला नसता.'
View this post on InstagramA post shared by Shanthi Priya (@shanthipriya333)
ती पुढे म्हणाली की, 'लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत परीक्षा संपल्यावर मी केस कापून लहान करायची. पण मोठे झाल्यावर तिला कधीच टक्कल करून पाहता आलं नाही की मी यात कशी दिसेल. त्यामुळे आता तिने हा लूक करून पाहण्याचं ठरवलं.' तसंच ती म्हणाली, "जेव्हा आपल्याला केस हायलाइट करायचे असतात, तेव्हा ते कापून घ्यावे लागतात. मग टक्कल का नाही? पुरुष तर काहीही करू शकतात आणि ते केस पण वाढवतात. मग जर ते काहीही करू शकतात, तर आम्ही महिला का नाही? केस तर पुन्हा वाढणारच आहेत, म्हणून मी ठरवलं की करून पाहूया."
दरम्यान 10 एप्रिलला शांती प्रियाने सोशल मीडियावर तिच्या टक्कल केलेल्या केसांचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने तिच्या दिवंगत पती सिद्धार्थ रॉयचं ब्लेझर घातलं होतं. तिचा तो लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाला होता.
FAQs
शांती प्रियाने टक्कल लूक का निवडला?
तिने हा लूक स्वतःवर प्रयोग करण्यासाठी आणि एक वेगळी भावना अनुभवण्यासाठी निवडला. प्रसिद्धीसाठी हा निर्णय नव्हता.
तिने हा लूक कधी सोशल मीडियावर शेअर केला?
१० एप्रिल २०२५ रोजी शांती प्रियाने तिच्या टक्कल लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
या फोटोंमध्ये तिने काय खास घातलं होतं?
तिने तिच्या दिवंगत पती सिद्धार्थ रॉय यांचा ब्लेझर परिधान करून फोटो काढले होते.
लोकांनी तिच्या लूकवर कशी प्रतिक्रिया दिली?
काहींनी तिला धाडसी म्हटलं, तर काहींनी प्रसिद्धीसाठी असं केल्याचं आरोप केले. मात्र अनेकांनी तिचं कौतुकही केलं.
आराध्याला झालं तरी काय? गणपतीच्या दर्शनासाठी आल्यावर अशी का वागली? चाहत्यांना लागली चिंता, व्हिडिओ व्हायरल