लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी! सामान्यांची रेटारेटी, तर व्हीआयपी गेटवर आमदार पत्र धारकांची झुंबड
esakal September 04, 2025 06:45 PM

मुंबई : लालबाग परिसरात ‘मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी केवळ मुंबईच नव्हे तर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. या राजाच्या दरबारी सेलेब्रिटीही हजेरी लावतात. आठव्या दिवशी दिवशी ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली होती. यामध्ये सामान्य लोकांनी रांगेतून प्रवेश करण्यासाठी रेटारेटी करत होते. तर व्हीआयपी गेटवर आमदार पत्र धारकांची झुंबड उडाली होती.

राज्यासह देशभरात २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन झाले. दीड , अडीच , पाच आणि सात दिवसांचे गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मुंबईकर गणपती दर्शनासाठी बाहेर पडले आहेत. दरवर्षी ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात, त्या गर्दीतही राजाचे मनमोहक रूप भाविक आपल्या डोळ्यांत साठवतात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाजनवळच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली अर्थात ‘मुंबईचा राजा’ आहे.

एकीकडे मुंबईचा राजासाठी गर्दी कमी आहे. तर नवसाला पावणारा बाप्पा अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाच्यादर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. गौरी आणि गणपती विसर्जनानंतर भाविकांची मोठी गर्दी वाढते. रांगेत प्रवेशासाठी सामान्य प्रयत्न करत होते. मात्र त्यांना लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आणि पोलीस पाठीमागे ढकलत होते. त्यामुळे भाविकांना त्रास झाला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत लालबागच्या राजाच्या दर्शनाची प्रतीक्षा करत होते.

Western Railway: पश्चिम रेल्वेकडून गणपती विसर्जनासाठी अतिरिक्त सेवा, थांब्यांमध्ये बदल; पाहा वेळापत्रक २० टक्के गर्दी वाढली

गौरी आणि गणपती विसर्जनानंतर २० टक्के भाविकांची संख्या वाढली आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलनामुळे अनेक मुंबईकर घराबाहेर पडले नव्हते. परंतु मंगळवारी आंदोलन संपल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली झाली आहे. त्यामध्ये गुरुवारी आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

  • गौरी आणि गणपती विसर्जनानंतर भाविकांची संख्या वाढली आहे. आज प्रचंड गर्दी आहे. त्याचे नियोजन करण्याचे काम सुरु आहे.

- बाळासाहेब कांबळे , अध्यक्ष , लालबागचा राजा

  • मी दर्शनासाठी मंगळवारी रात्री ९.४५ वाजता नवसाच्या रांगेत उभी होती. बुधवारी ४ वाजता मला दर्शन मिळाले खूप चांगले वाटले.

- कविता शुक्ला , भाविक , धारावी

भव्य गणपती विसर्जन पाहण्यासाठी मुंबईतील 'ही' ठिकाणे आहेत बेस्ट
  • मी मुंबईत दोन ते तीन वेळा आलो आहे. यंदा प्रथमच गणेशोत्सव काळात यायला मिळाले. खूप चांगला उत्सव आहे मी त्याचा आनंद घेतला.

- बॅस्टिअन स्वाईब , पर्यटक , जर्मनी

  • मी भोपाळला राहते . माझा एक लहान अपघात झाला होता त्यावेळी मी लालबागला दर्शनासाठी येण्याचे ठरवले होते. आता कुटुंबियांसह आले आहे.

- मुस्कान हेबनानी , भाविक भोपाळ

  • मी पुणे येथून कुटुंबियांसह लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी आलो. एव्हडी गर्दी पाहता किती वेळ लागेल सांगता येत नाही.

- ज्ञानेश्वर रोकडे , भाविक , पुणे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.