जेरोधा प्लॅटफॉर्मवर तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे निफ्टी आणि स्टॉक्सचा डेटा ‘nil’ दाखवत होता.
युजर्सनी सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पाडला आणि नितीन कामत यांच्यावर टीका केली.
कंपनीने नंतर समस्या सोडवल्याचे सांगून प्लॅटफॉर्म पुर्ववत झाल्याचे जाहीर केले.
Zerodha Down: देशातील सर्वात मोठी रिटेल ब्रोकिंग कंपनी जेरोधाच्या (Zerodha) ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये सकाळी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे स्टॉक आणि व्हॉल्यूम कोट्स दिसेनासे झाले आणि गुंतवणूकदार गोंधळले. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने युजर्सनी तक्रारी केल्या. ‘DownDetector’ वेबसाईटवर सकाळी 9:40 पर्यंत तब्बल 8,143 तक्रारी आल्या होत्या.
युजर्सना मोठा फटकाहा बिघाड शेअर बाजार उघडताच झाला. इंडेक्स व्हॅल्यू अपडेट होत नव्हती आणि तिच्या जागी ‘nil’ (रिकामी) दिसत होती. प्रत्यक्ष बाजार मात्र तेजीत होता. उदाहरणार्थ, सकाळी 10:30 वाजता निफ्टी 24,598.90 वर होता, म्हणजेच 19.30 अंकांनी किंवा 0.08% वाढलेला होता. पण अॅपवर चुकीची माहिती दिसल्याने युजर्सनी संताप व्यक्त केला.
Silver Price: चांदीला 'सोन्याचे' दिवस येणार! या वर्षात दिला सर्वात जास्त परतावा; भाव 2 लाखांवर जाणार सोशल मीडियावर संतापाची लाटएक यूजर म्हणाला, “पैसे परत द्या.” दुसऱ्याने जेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत यांना उद्देशून लिहिले की, “पॉडकास्टवर कमी आणि अॅपच्या तांत्रिक गोष्टींवर जास्त लक्ष द्या.” गोंधळ वाढल्यानंतर जेरोधानेअधिकृत निवेदन देत सांगितले की, तांत्रिक समस्या सोडवली आहे आणि आता प्लॅटफॉर्म व्यवस्थित काम करत आहे.
Silver Price: चांदीला 'सोन्याचे' दिवस येणार! या वर्षात दिला सर्वात जास्त परतावा; भाव 2 लाखांवर जाणार FAQsQ1. जेरोधामध्ये काय तांत्रिक बिघाड झाला?
- निफ्टी आणि स्टॉक डेटा अपडेट न होता ‘nil’ दाखवत होता.
-The issue was that Nifty and stock data were not updating and showed as ‘nil’.
Q2. ही समस्या कधी उद्भवली?
- बाजार उघडल्यानंतर सकाळी 9:30–10:00 दरम्यान ही अडचण आली.
- The glitch occurred around 9:30–10:00 AM after market opening.
Q3. युजर्सची प्रतिक्रिया काय होती?
- युजर्सनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि पैसे परत देण्याची मागणी केली.
- Users expressed anger on social media and demanded refunds.
Q4. जेरोधाने या प्रकरणावर काय सांगितले?
- जेरोधाने सांगितले की समस्या ओळखून ती सोडवली आहे आणि आता प्लॅटफॉर्म नीट काम करत आहे.
- Zerodha stated that the issue was identified and resolved, and the platform is now functioning normally.
Q5. नितीन कामत यांच्यावर युजर्स का भडकले?
- कारण युजर्सना वाटले की ते अॅप सुधारण्यापेक्षा पॉडकास्टसारख्या गोष्टींवर जास्त लक्ष देत आहेत.
- Users felt that he was focusing more on podcasts than on improving the trading app.