GST Council Meeting : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीला सुरुवात झाली आहे. ही बैठक एकूण दोन दिवसांची असेल. या बैठकीत देशातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे करप्रमाणाली, जीएसटीची सध्याची पद्धत, वेगवेगळ्या वस्तूंवरील कर याबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सरकार वेगवेगळ्या 175 वस्तूंवरील कर घटवण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
फक्त दोनच टॅक्स स्लॅब राहणार?मिळालेल्या माहितीनुसार सरकार साधारण 175 वेगवेगळ्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करत आहे. जीएसटीमधील ही घट साधारण 10 टक्क्यांपर्यंत असू शकते, असे सांगितेल जात आहे. सध्या जीएसटीअंतर्गत एकूण 5%, 12%, 18% आणि 28% असे एकूण चार स्लॅब आहेत. जीएसटी परिषदेच्या बैठकीत चार ऐवजी आता फक्त दोनच स्लॅब करण्याचा प्रस्तावीत आहे. या प्रस्तावअंतर्गत आवश्यक वस्तूंसाठी 5 टक्के तर तुलनेने कमी गरजेच्या वस्तूंवर 18 टक्के अशी करप्रणाली लागू करण्याचाही प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. तंबाखूजन्य उत्पादनांसाठी, 50 लाखापेक्षा जास्त किंमत असलेल्या वस्तूंसाठी 40 टक्के कराचा एक अतिरिक्त स्लॅब लागू करण्याचाही या बैठकीत निर्णय होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
सामान्य लोकांना मिळणार दिलासाजीएसटीच्या प्रस्तावित बदलांमध्ये 12 टक्के कर असलेल्या वस्तूंवर कर कमी करून सामान्यांना दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. 12 टक्के स्लॅबमधील साधारण 99 टक्के वस्तू या 5 टक्के स्लॅबमध्ये आणल्या जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सुखा मावे, नमकीन, पॅक लेले पाणी, काही प्रकारचे बुट, कपडे, औषध, वैद्यकीय उपकरण, रोजच्या वापरातील वस्तू यांचा यात समावेश आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास समान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जीएसटी परिषदेत नेमकं काय होणार?मिळालेल्या माहितीनुसार पर्सनल केअर प्रोडक्ट्स, टुथपेस्ट, साबण, शाम्पू, टॅल्कम पाऊडर, जाम, स्कॅन्क्स आदी वस्तूदेखील स्वत् होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता जीएसटी परिषदेत नेमके काय निर्णय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.