भोसरी, ता. ३ ः स्वरांजली कला क्रीडा मंचाद्वारे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. सागर जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले साहित्यिक, सांस्कृतिक उदात्त जीवनमूल्य प्रकटीकरण करण्याचा मंत्र महाकवी वामनदादांनी जपत मराठी भाषेला समृद्ध करणारी साहित्यकृती निर्माण केली. असे मत व्याख्याते प्रा. सागर जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. देवानंद उबाळे, पालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर, देवेंद्र तायडे, राजशेखर डोळस, अॅड. धर्मराज साळवे, अमोल डोळस, संतोष जोगदंड, संकल्प गोळे, बापू गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश डोळस होते. गायक कुणाल वराळे, सरला वानखेडे, प्रा. किशोर वाघ, आनंद सावंत, क्रांती शिंदे, राजेश वाघचौरे, नागेश नांदेडकर, समृद्धी उजगरे आदींनी वामनदादांनी रचलेली भीमगीते सादर केली. कार्यक्रमाचे नियोजन साधना मेश्राम, श्याम सोनवणे, गोकूळ चव्हाण, कैलास पाटील, बाबासाहेब साळवे, राहुल भगत, विजय भालेराव, धम्मपाल गायकवाड, प्रभाकर माने, सिद्धार्थ पवार आदींसह इतर मान्यवरांनी केले. सूत्रसंचालन विकास गायकवाड यांनी तर आभार कैलास पाटील यांनी मानले.