अर्जुन नाहीतर सायलीला आवडते ''ही" व्यक्ती, चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाली, " मी माझ्या मनात..."
esakal September 07, 2025 08:45 AM

1 जुई गडकरीने चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन नाही तर प्राजक्ता कुलकर्णी तिची आवडती व्यक्ती असल्याचं सांगितलं.

2 जुईने प्राजु तिची आईसारखी काळजी घेते, लाड करते आणि एकत्र गप्पा मारतो असं सांगितलं.

3 चाहत्यांना जुईचा हा खुलासा सोशल मीडियावर खूप आवडला आणि चर्चा सुरू झाली.

''ठरलं तर मग' मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. प्रेक्षकांच्या घरातील ती एक भाग झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत नवनवे ट्विस्ट येताना पहायला मिळत आहे. त्यामुळे चाहत्यांना मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे. मालिकेतील सायली देखील प्रेक्षकांच्या घरातील एक भाग झाली आहे. तिच्या अभिनयासह तिचा साधेपणा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो.

सायली सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमीच ती तिचे अडपेट्स चाहत्यांना देत असते. चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना देत असते. अशातच आता सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आस्क मी हे सेशन सुरु केलय. यावेळी चाहत्यांनी तिला 'ठरलं तर मग' मालिकेच्या सेटवर कोण जास्त आवडतं? असा प्रश्न केला. सेटवरील सर्वात जास्त जीवभावाचं कोण असल्याचं तिला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने अर्जुनचं नाव न घेता दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेतलंय.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देत जुई गडकरी म्हणाली की, 'मी माझ्या मनात जास्त काही ठेवत नाही. परंतु प्राजु मला कधीच सेटवर आईची कमी भासू देत नाही. माझे प्रचंड लाड करत असते. मी कधी चुकले तर मला ओरडते सुद्धा. तिचं माझं खुप बॉण्डिंग आहे. आम्ही खुप गप्पा मारत असतो. आम्ही दोघी रुम पार्टनर्स सुद्धा आहोत.' असं म्हणत तिने प्राजक्ता कुलकर्णीचा तिच्यासोबतचा फोटो सुद्धा शेअर केला.

यावेळी दुसऱ्या नेटकऱ्याने तिला विचारलं की, 'आतापर्यंत तुला आवडलेली सर्वांत भारी मालिका कोणती?' यावर ती म्हणाली की, 'सगळ्याच मालिकांनी प्रचंड प्रेम दिलं. माझं माझ्या सगळ्याच भूमिकेवर प्रेम आहे. मी सगळ्याच मालिकांमध्ये मनापासून काम केलय. परंतु माझ्यावर खरं प्रेम सायलीनं केलंय. ज्याची मी वाट पाहत होते ते सगळं मला सायलीनं दिलय.' असं ती चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाली.

FAQs

जुई गडकरीने तिची आवडती व्यक्ती कोण सांगितली?

प्राजक्ता कुलकर्णी.

चाहत्यांनी जुईला कोणता प्रश्न विचारला होता?

सेटवर सर्वात आवडती व्यक्ती कोण आहे?

जुईने प्राजक्तेबद्दल काय सांगितलं?

ती माझी आईसारखी काळजी घेते आणि लाड करते.

जुईने चाहत्यांना कुठे उत्तर दिलं?

इन्स्टाग्राम आस्क मी सेशनमध्ये.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, दोघांविरोधात लुकआऊट नोटीस जारी, 60 कोटी रुपयांचा घोळ केल्याचा आरोप
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.