सिल्लोड येथील पोलिसांच्या तत्परतेमुळे बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे अपहरण होण्यापासून वाचवले गेले. केळगाव परिसरात शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकरणात चार जणांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे विद्यार्थ्याची सुरक्षित सुटका झाली, तर आरोपींना हर्सूल कारागृहात नेण्यात आले आहे.
Jalgaon News: जळगावचा पाचोर्यात जशन-ए-ईद मिलादुन्नबी जल्लोषात साजरीपैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी जशन-ए-ईद मिलादुन्नबी निमित्त पाचोरा शहरात रविवार रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील प्रमुख मशिदी, मदरसे, तसेच विविध मुस्लिम समाज संघटनांच्या सहभागाने ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. पहाटेपासूनच मशिदींमध्ये कुरान पठण, नाते-शरीफ व सलाम पठणाचे कार्यक्रम झाले. त्यानंतर दुपारी शहरातून जुलूस काढण्यात आला.
Chhattisgarh News: माओवाद्यांचा मोठा कट उधळला, साहित्य जप्तबिजापूर जिल्ह्यातील उसिर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एफओबी गुंजेपर्टी परिसरातील जंगलात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत, शस्त्रे आणि स्फोटके बनवण्याचे साहित्य आणि माओवाद्यांनी जंगलात टाकलेले मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेली सर्व उपकरणे आणि साहित्य सुरक्षिततेच्या मानकांनुसार नष्ट करण्यात आले, ज्यामुळे माओवाद्यांचा संभाव्य मोठा कट उधळून लावण्यात आला.
Uttarakhand News: उत्तराखंडमध्ये नैसर्गिक आपत्ती सुरूच, राजस्थान सरकारकडून ५ कोटी रुपयांची मदतउत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थिती लक्षात घेता, राजस्थान सरकारने उत्तराखंड सरकारला ५ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. ही मदत राज्यातील आपत्तीग्रस्त भागात तात्काळ मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांसाठी वापरली जाईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना लिहिलेल्या पत्रात, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी दुःखद परिस्थितीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे, "नैसर्गिक आपत्तीच्या या कठीण काळात, आम्ही उत्तराखंडच्या लोकांचे दुःख आपले मानतो."
Rain Update: तामिळनाडूत मुसळधार पाऊस! विमानतळाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली, नागरिकांचे हालतामिळनाडूतील मदुराईच्या अनेक उपनगरीय भागात पावसाची संततधार कोसळत आहे. यामुळे अवनियापुरम ते विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. परिणामी येथील नागरिकांचे हाल होत आहे.
Mumbai News: कोस्टल रोडवरून धावणार जादा बस, बेस्टच्या ताफ्यात १७ नवीन इलेक्ट्रिक बस दाखलबृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाने त्यांच्या ताफ्यात १७ नवीन १२-मीटर इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या आहेत, त्यापैकी काही रविवारपासून कोस्टल रोडवर नव्याने सुरू झालेल्या मार्गावर धावतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Live : वडोदा येथील सैनिक 21 वर्षाची देश सेवा करत झाले सेवानिवृत्त गावात भर पावसात काढण्यात आली मिरवणूकमुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा गावातील सीआर पीएफ सैनिक विनोद पंढरी लहासे यांनी 21 वर्ष देश सेवा करत आज त्यांच्या मूळ गावी वडोदा येथे जल्लोषात सत्कार औक्षण करत स्वागत तसेच भव्य दिव्य भर पावसात मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गावातील महिला नागरिक या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले.
Laslgaon Live : पूरग्रस्त पंजाबकरांना लासलगाव कांदा व्यापाऱ्यांची मदतीची मोठी मदतपंजाबमध्ये आलेल्या महापुरामुळे लाखो नागरिकांचे हाल होत असताना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. रविवारी तब्बल ४० टन कांदा, ज्याची बाजार किंमत जवळपास पाच लाख रुपये इतकी आहे, पंजाबमधील फकवाडा गुरुद्वाराकडे रवाना करण्यात आला. येथून हा कांदा वेगवेगळ्या प्रांतातील पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. लासलगावच्या व्यापाऱ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, व्यापारी वर्गाने आणखी मदतीची गाडी पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Mumbai Live : लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं ! साडेदहा-अकरा वाजेपर्यंत लांबण्याची शक्यतागिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं आलं आहे. मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आलं असलं तरीही विसर्जन रात्री 10:30 ते 11पर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
Pune Ganpati Visarjan: पुण्यातील टिळक रोडवर अजूनही विसर्जन मिरवणूक सुरूपुण्यातील टिळक रोडवर अजूनही गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे. ३२ तास उलटून गेले आहेत. केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक संपली आहे.
Pune Ganpati Visarjan: पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सहा तासावरून गेली बत्तीस तासांवरपुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सहा तासावरून आता 32 तासांपर्यंत पोहचली आहे. पुण्याला गणपती विसर्जन मिरवणुकीचा 77 वर्षांचा इतिहास आहे.
1948 पासून ते 2025 पर्यंत कुठल्या वर्षी मिरवणुकीला किती वेळ लागला.
1948 - 6 तास 30 मी
1949 - 8 तास
1952 - 9 तास 15 मी
1953 - 9 तास 30 मी
1954 - 11 तास
1967 - 17 तास 24 मी
1978 - 21 तास 30 मी
1989 - 29 तास 25 मी
2005 - 33 तास 20 मी
2016 ते 2019 - 28 तास 15 मी
2020 ते 2021 कोरोनामुळे मिरवणूक नाही.
2022 - 31 तास
2024 - 30 तास 15 मी
2025 अजून मिरवणूक सुरू
शेवटचा मानाचा गणपती अलका चौकात दाखल झाला आहे. इतर रस्त्यावरील मंडळ गेल्यानंतर महराष्ट्र तरुण मंडळ पुढे जाणार आहे. केळकर रास्ता आणि शास्त्री रस्ता आणखी मंडळ असल्याने शेवटचा गणपती अलका चौकात थांबवला आहे. विसर्जन मिरवणूक 32 तासात संपणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस आयुक्त टिळक चौकात दाखल झाले आहेत.
Mumbai Live : दहिसर पूर्वेकडील जनकल्याण नगरमध्ये मोठी आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सूरुदहिसर पूर्वेकडील जनकल्याण नगरमध्ये मोठी आग
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या
दहिसर पोलिस देखील घटनास्थळी
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सूरु
आगीचे कारण अस्पष्ट
Live : राजकीय पोळी भाजण्याची काम करणाऱ्या लोकांनी ओबीसी आणि मराठा लोकांचा वापर केला - शिवेंद्रराजे भोसलेराजकीय पोळी भाजण्याची काम करणाऱ्या लोकांनी ओबीसी आणि मराठा लोकांचा वापर केला यात काँग्रेस,राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनी हे काम केले
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य
Dhule Live : ट्रक अपघातात दोन ठार, एक गंभीर जखमीधुळे तालुक्यातील वरखेडी फाटा परिसरात लोखंडी सळया वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रॅक्टरने दिलेल्या हुलकावणीमुळे हा अपघात घडला. या दुर्घटनेत कंटेनरमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mumbai Live : विरारमध्ये ४० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जखमीविरारच्या डोंगरपाडा परिसरात ४० वर्षे जुनी इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. श्री गणेश को-ऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटी या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला.
या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जुन्या इमारतीत तब्बल १७ कुटुंब राहत होते.
वसई-विरार महानगरपालिकेने आधीच ही इमारत धोकादायक असल्याचे घोषित केले होते. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षेच्या कारणास्तव सर्व रहिवाशांना बाहेर काढले आहे.
Purandar Live Updates : पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पाला ग्रामस्थांचा जोरदार विरोध, मुख्यमंत्र्यांकडे निवेदनपुरंदर तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असून, यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले आहे.
आज आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक जयंतीनिमित्त मुख्यमंत्री पुरंदर दौर्यावर आहेत. ग्रामस्थांनी या प्रसंगी "आम्हाला विमानतळ नको, विकासाच्या नावाखाली होणारा हा प्रकल्प थांबवावा" अशी मागणी केली.
ग्रामस्थांनी सांगितले की, "देवभाऊंना आम्ही बहिणीप्रमाणे राखी बांधली आहे, त्यामुळे ओवाळणी म्हणून ते विमानतळ रद्द करतील, अशी आम्हाला आशा आहे."
Nashik Live: नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी, १२ जण जखमीनाशिकच्या बागलाण येथून नांदगावला शेती कामासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा आंबसन फाट्याजवळ अपघात होऊन 12 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या रस्त्यावरील काम अनेक दिवसांपासून अपूर्ण असल्यामुळे रस्त्यावर चिखल साचला होता, ज्यामुळे वेगाने जात असलेला पिकअप पलटी झाला. सर्व जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Pune Live: मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज पुण्यातमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज पुण्यात
पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये भिवडी गावात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार
भिवडी गावात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक समाधी स्थळावर अभिवादन करतील
हुतात्मा उमाजी नाईक विद्यालय येथे जयंती सोहळा कार्यक्रम
Amaravati Live : अमरावतीत भूकंपाचे २ सौम्य धक्के, नागरिक भयभीतअमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी गावाला बसले भूकंपाचे दोन सौम्य झटके...
भूकंपाच्या झटक्याने गावातील अनेक घरातील भांडे पडल्याची घटना तर एका ठिकाणी नाल्याला भेगा गेल्याची ग्रामस्थांची माहिती..
सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास बसले भूकंपाचे धक्के...
भूकंपाचे धक्के बसल्याने गावातील नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण...
काही वर्षांपूर्वी ही गावात अशाच पद्धतीने दोनदा भूकंपाचे धक्के आल्याची ग्रामस्थांची माहिती.
Pune Live : पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबलपुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल
अलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी उडवले फटाके
नियोजन करूनही पुण्यातील विसर्जन मिरवणूक रेंगाळली
एकजण ताब्यात पोलिसांच्या नाकावर टिचून फोडले चौकात फटाके
Beed Live : बीडच्या भरत खरसाडे यांच्या वडिलांना माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या फोनमराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीडच्या भरत खरसाडे यांच्या वडिलांना माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या फोन.
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी फोन द्वारे सांत्वन करत भरत खरसाडेबाबत विचारपूस करत आम्ही तुमच्या सोबत आहोत धीर धरा घासू नका असा धीर दिला.
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून कॅश स्वरूपात तीन लाख रुपयांची आर्थिक मदत.
Maharashtra Live : ओमराजे निंबाळकर अन् राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने सामनेगणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने सामने
गणेश उत्सव मिरवणुकीत मल्हार पाटील समर्थकांच्या गराड्यात, समर्थकांकडून दंड थोपटून गाण्याच्या तालावर खासदार ओमराजेना आव्हान
नादी नको लागू माझ्या तुला चांगलाच रडविन,ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडविल गाण्यावर मल्हार पाटलांचे रील व्हायरल
स्मित हास्य करत खासदार ओमराजे निंबाळकरून भाजप कार्यकर्त्यांना प्रतिसाद
Mumbai Live : गणेशोत्सवानंतर मत्स्य खवय्यांची मासे खरेदीसाठी गर्दीश्रावण आणि गणेशोत्सव यामुळे ओस पडलेले मच्छी बाजार आज पुन्हा गजबजले आहेत.
गेल्या काही दिवसात मासे बाजारात मत्स्य खवयांनी पाठ फिरविली होती.
मात्र काल गणपती विसर्जन झाल्यानंतर आणि आज पहीलाच रविवार आल्यामुळे मासे बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. माशांचे दरही त्यामुळे वधारले होते.
पापलेट सोळाशे रुपये किलो, सुरमई तेराशे रुपये, मोरी मासा सहाशे ते आठशे रूपये किलो तर बांगडे तीनशे ते चारशे रुपये किलो अशा दराने विकले गेले.
माशांचे दर वाढलेले असूनही खवय्यानी ते खरेदी केल्याचे पाहायला मिळत होते.
Shirdi Live : साई मंदिरातील आरतीच्या वेळेत बदलचंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज आरतीच्या वेळेत बदल...
दररोज रात्री 10:30 वाजता होणारी शेजारती आज रात्री 9:15 मिनिटांनी होणार...
आरतीनंतर साई मंदिर होणार बंद...
आरतीची वेळ ग्रहण काळात असल्याने आजच्या आरती वेळेत करण्यात आलाय बदल.
Pune LiveUpdate: येरवडा कॉमरझोन आयटी पार्क मध्ये सहाव्या मजल्यावर ऑफिसला आगआज सकाळी 7.45 वाजता येरवडा कॉमरझोन आयटी पार्क मध्ये सहाव्या मजल्यावर ऑफिसला आग लागली होती. अग्निशमन दलाकडून केंद्राला कॉल आल्यानंतर त्वरित फायर गाडी घटनास्थळी दाखल होत जवानांनी सदर ठिकाणी होजच्या साह्याने तसेच आयटी पार्क येथील स्थायी अग्निशमन यंत्रणा वापरून सिस्टीमच्या साह्याने आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे विझवली. घटनास्थळी येरवडा, खराडी, नायडू, धानोरी अग्निशामक केंद्र फायर गाड्या दाखल होत्या. जवानांनी आगीवर अर्ध्या तासामध्ये नियंत्रण मिळवत आग इतरञ पसरू न देता मोठा धोका टाळला. आगीमध्ये सर्व कागदपत्रे, फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तू व इतर साहित्य जळाले. जिवितहानी व जखमी कोणी नसून सदर ठिकाणी नायडू अग्निशामक केंद्रातील एका जवानाला (फायरमन सोन्यादादा नायडू) पायाला दुखापत झाली आहे.
Shirdi LiveUpdate: साई मंदिरातील आरतीच्या वेळेत बदलचंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज आरतीच्या वेळेत बदल...
दररोज रात्री 10:30 वाजता होणारी शेजारती आज रात्री 9:15 मिनिटांनी होणार...
आरतीनंतर साई मंदिर होणार बंद...
आरतीची वेळ ग्रहण काळात असल्याने आजच्या आरती वेळेत करण्यात आलाय बदल.
LiveUpdate: धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभाओबीसींचे हक्क, अधिकार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात आंदोलन करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली संघर्ष यात्रा 2.0 सुरू ठेवली आहे. या यात्रेदरम्यान गावागावांत जाऊन ते जनजागृती सभा घेत आहेत. यापूर्वी ही त्यांच्यावर 8 वेळा काही समाजकंटकांनी जीवघेणे हल्ले झाले. तरीही, हाके यांनी न घाबरता बीड जिल्ह्यातील गेवराई, केज आणि धारूर येथील दौरे सुरू ठेवले आहेत. धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे ‘महा एल्गार सभा’चे आयोजन करण्यात आले आहे.
Punjab Flood Live : अभिनेता सोनू सूद पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी अमृतसर विमानतळावर दाखलअभिनता सोनू सूद याने सांगितले की,, "मी बागपूर, सुलतानपूर लोधी, फिरोजपूर, फाजिल्का, अजनाला येथे जात आहे आणि मी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. मला वाटते की येणाऱ्या काळात पंजाबमध्ये अजूनही पाऊस पडत असल्याने अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, लोकांचे जीवनमान उद्ध्वस्त झाले आहे, म्हणून मी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेन आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्या गरजांची यादी घेईन. पंजाबला पुन्हा त्याच्या पायावर उभे करण्यासाठी किमान काही महिने लागतील. मला वाटते की सर्वजण पुढे येत आहेत.
Konkan News : गणपतीला कोकणात गेलेले परतीच्या मार्गावर, रेल्वे स्टेशनवर तुडुंब गर्दीगणपती विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यामुळे रेल्वे स्टेशनवर तुडुंब गर्दी झालीय. अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जन केल्यानंतर कोकणवासीय चाकरमानी आता मुंबईकडे रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. कोकणातली सर्वच रेल्वे स्टेशन गर्दीने फुलून गेली आहेत. अनेक प्रवाशांना तिकीट न मिळाल्याने दुप्पट तिप्पट दराने तिकीट घ्यावी लागली आहेत.
Pune Ganesh Visarjan : पुण्यात विसर्जन मिरवणुकीला २३ तास पूर्ण, १०० गणपतींचं विसर्जनपुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २३ तास पूर्ण झालेत. शनिवारी सकाळपासून अलका टॉकीज चौकातून १०० मंडळाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी सकाळी ९.३० वाजता झाली होती. पुण्यात अजूनही अनेक मंडळ त्यांच्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतायत.
Lalbaugcha Raja Visarjan : लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक २२ तासांनी गिरगाव चौपाटीवरलालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक २२ तासांनी गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे. लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जनासाठी खास तयार करण्यात आलेल्या तराफ्यावर ठेवण्यात आलीय. थोड्याच वेळात लालबाग राजाला भावपूर्ण निरोप दिला जाईल. गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय.
Weather Updates : राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता, पालघर-नाशिकलाऑरेंज अलर्टगणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांत पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. हवामान विभागाने पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून, अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर आणि नाशिक घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता. मुंबई, रायगड, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी. माथेरान, अंबरनाथ आणि वसईत मुसळधार पावसाची नोंद. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
Pune News : नातावाला संपवून मुलाच्या हत्येचा बदला घेतला, आजोबा बंडू आंदेकरवर गुन्हा दाखलगोविंद कोमकर खून प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यावर गुन्हा दाखल जी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष याचा शुक्रवारी सायंकाळी नाना पेठेत गोळीबार करून खून करण्यात आला गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर असे खून झालेल्याचे नाव या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला