अनंत चतुर्दशीच्या दिवशी, शनिवारी (०६ सप्टेंबर) गणपतीला मोठ्या थाटामाटात निरोप देण्यात येत आहे. लालबागचा राजा २०२५ चा भव्य विसर्जन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विसर्जन सोहळ्यादरम्यान बाप्पांना निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. तर फुलंब्री शहरात गेल्या तब्बल ९० वर्षांपासून गणेशोत्सवात बैलगाडीतून निघणाऱ्या सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुकीची परंपरा आजही उत्साहात सुरू आहे. १९३५ साली सुरू झालेली ही मिरवणूक आज गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रमुख आकर्षण बनली आहे.
या मिरवणुकीची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे गणरायाची मूर्ती सजवलेल्या बैलगाडीत विराजमान करून शहरातील मुख्य रस्त्यांवरून नेली जाते. हरिनामाचा गजर, ढोल-ताशांचा दणदणाट, टाळ-मृदंगाच्या तालावर गायली जाणारी अभंग-कीर्तनाची मंडळी यामुळे मिरवणुकीला पारंपरिक आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. गावातील नागरिक, महिला मंडळे, युवक मंडळे आणि सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी होतात. मिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक संदेश देणारे फलक, पारंपरिक वेशभूषेतील पथके आणि धार्मिक झांज-मृदंग पथके गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.
Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा ओपेरा हाऊसजवळ दाखलफुलंब्रीकरांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेली ही मिरवणूक केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता गावाच्या ऐक्याचे, एकोप्याचे आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारे माध्यम ठरली आहे. गणेशोत्सव काळात प्रत्येक वर्षी गावकरी भाविकयाची आतुरतेने वाट पाहतात. गणेशोत्सवानिमित्त फुलंब्री शहरात निघालेल्या गणेश मंडळाच्या मिरवणुकीत विविध पारंपरिक झांज-पथक, ढोल-ताशांचा गजर यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
मात्र या मिरवणुकीत महादेव व माता पार्वतीच्या साकारलेल्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फुलंब्री शहरातील चिमुकल्यांनी साकारलेली ही वेशभूषा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. महादेवाच्या रुपातील साधेपणा आणि पार्वतीच्या रुपातील अलंकारिक सजावट पाहून उपस्थित भाविक भारावून गेले. वेशभूषेच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडविण्याचा उपक्रम गणेश मंडळाने राबविल्याने नागरिकांनीही त्याचे स्वागत केले.
Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओमिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक संदेश देणारे नृत्य पथके आणि पारंपरिक लोककला प्रकार सादर करण्यात आले. परंतु, महादेव-पार्वतीच्या वेशभूषेने मिरवणुकीला वेगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले. गणेशोत्सवात दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याची परंपरा फुलंब्रीतील गणेश मंडळ जपत असून, यंदाच्या मिरवणुकीतील हा उपक्रम आकर्षणाचा ठरला.