Maharashtra Live News Update: गेल्या २० तासांपासून पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरूच
Saam TV September 08, 2025 06:45 AM
यवतमाळात आज पासून रामकथा पर्व

मोरारी बापू यांचा रामकथा पर्व सोहळवा यवतमाळ येथील चिंतामणी मार्केट यार्ड लोहारा इथे आज पासून आयोजित करण्यात आलाय. या कथा पर्व सोहळ्यासाठी नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सात ते 14 सप्टेंबर या कालावधीत यवतमाळ शहरातील विविध 18 ठिकाणाहून विशेष बस फेऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणुकीत भाजपमधील कलह चव्हाट्यावर

विघ्नहर्त्याचे विसर्जन चंद्रपूर भाजपात विघ्न निर्माण करणारा ठरला. विसर्जनाच्या निमित्ताने भाजपमधील दोन दुफळी पुन्हा एकदा समोर आली.

चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरून बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघते.

हजारो लोक यात सहभागी होतात. बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे मंडप रस्त्याशेजारी लागतात. हा दरवर्षीचा शिरस्ता आहे.

आजवर भाजपतर्फे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचाच मंडप राहायचा. मात्र, भाजपचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी आपला वेगळा मंडप उभारला.

त्यामुळे मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे यानिमित्ताने दिसून आले. आजपर्यंत जिल्ह्यातील भाजप मुनगंटीवार यांच्याभोवती केंद्रित होती.

भाजपचे विशाल परब यांनी रत्नागिरी राजाचं घेतलं दर्शन

रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री रत्नागिरीचा राजा या गणपतीच आज विसर्जन होणार आहे.

रत्नागिरीचा राजाच्या प्रतिष्ठापना झालेल्या गणरायाचे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दर्शन घेतलं.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीमध्ये वरिष्ठ निर्णय घेतील.

युती संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार भाजपच्या वरिष्ठांना.

त्यामुळे या संदर्भातील लवकरच गोड बातमी कोकणवासी यांना मिळेल अशी अपेक्षा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केली

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून साजरा झाला सामाजिक भान जपणारा गणेशोत्सव

क्रांतिकारी गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन सोहळा आज उत्साहात पार पडला. गणरायाच्या आरत्या, डफडे व डि जे चा गजर आणि भावनिक वातावरणात गणपती बाप्पांना साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.

यावेळी तरूणांनी विशेष गर्दी केली होती. परिसरातील नागरिक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. डफड्यांच्या तालावर रविकांत तुपकर यांच्या परीवारातील सर्वांनी. चौकट डान्स केला .

यावेळी महीला भगीनी पण थिरकल्या रविकांत तुपकर व सौ शर्वरीताई तुपकर यांनी फुगडी खेळत आनंद द्विगुणित केला.

विसर्जना वेळी गणपती बाप्पां चं ट्रैक्टर चालवत रविकांत तुपकर यांनी स्वतः सारथ्य केले गणपती विसर्जनाच्या वेळी वाजत-गाजत, डफडे व डि जे च्या गजरात भावपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला.

पैनगंगा नदी मध्ये बाप्पांचं विसर्जन केले गेले.उत्साह आणि ओढीबरोबरच डोळ्यांत पाणी आणणारा हा निरोपाचा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी आसमंत दणाणून गेला

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.