Nitin Gadkari News : नितीन गडकरींच्या खांद्यावर बंदूक, टार्गेटवर मोदी; मत चोरीनंतर आता काँग्रेसच्या हाती 'पेट्रोल बॉम्ब'
Sarkarnama September 05, 2025 04:45 PM

Pawan Khera Allegations : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मतदारसंघात भाजपने मतचोरी करून निवडणूक जिंकल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. देशभरात त्याविरोधात आवाज उठवला जात आहे. बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रेच्या माध्यमातून पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी रान उठवले. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी गुरूवारी गडकरी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी गडकरींचे पुत्र निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांच्या कंपन्यांवरून मोदी सरकार आणि गडकरींच्या इलेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणावर टीकास्त्र सोडले. मतांमध्ये भेसळ करून निवडून आलेले सरकार आता भेसळीवरच देश चालवत असल्याचे ते म्हणाले.

खेडा म्हणाले, नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्या Cian Agro Industries & Infrastructure Ltd, Manas Agro Industries And Infrastructure Ltd इथेनॉलची निर्मिती करतात. म्हणजेच सरकारमध्ये बसलेले वडील धोरम तयार करत आहेत आणि मुले पैसा कमावत आहेत.

OBC Reservation : ओबीसी महासंघानेही उधळला गुलाल; फडणवीसांचा निरोप घेऊन आलेले मंत्री ठरले संकटमोचक

कंपन्यांच्या शेअरची किंमत जानेवारी 2025 मध्ये 37 टक्के रुपये होती. ती आता वाढून 638 रुपये झाली आहे. म्हणजे या किंमतीत 2184 टक्के वाढ झाली. मागील 11 वर्षांच्या इतिहासात कोणतीही योजना वेळेवर पूर्ण झालेली नाही. मात्र, 2025 च्या आधीच देशाने 20 टक्के इथेनॉलचे उद्दिष्ट साध्य केल्याचा दावा खेडा यांनी केला आहे.  

आधी मत चोरी आणि आता पेट्रोल चोरी केली जात आहे. E-20 धोरणाच्या माध्यमातून लोकांकडील पैसे लुटले जात आहेत. इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आता ठिकठिकाणी आवाज उठवला जात आहे. 2014 पासून नितीन गडकरी या इथेनॉल निर्मितीसाठी लॉबिंग करत आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये गडकरी म्हणाले होते की, सरकार पाच इलेनॉल प्रकल्प उभारणार आहे. तिथे महापालिकांमधील कचरा आणि लाकडापासून इथेनॉल तयार केले जाईल, असा दावा खेडा यांनी केला.

Supreme Court : पोलिस कोठडीतील मृत्यू; सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकारला झटका देणाऱ्या सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल

खेडा यांनी असाही दावा केला की, गडकरींनी या धोरणामुळे डिझेल 50 रुपये आणि पेट्रोल 55 रुपये प्रति लिटर मिळेल. पण हा तर जुमला ठरला आहे. त्यांनी दिलेली आश्वासन फोल ठरले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या प्रकल्पांमधून एक थेंबही इलेनॉल निर्मिती झाली नाही. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.