दौंड शहरात एका विद्यार्थ्याला महाविद्यालयात आणि भरचौकात वीस जणांच्या जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना ही मारहाणीस सुरवात झाली होती. शहरातील एका महाविद्यालयात ४ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त वर्गात कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडला. जवाद शेख याने पीडित विद्यार्थ्यास अन्य आसनावर जाऊन बसण्याचे दराडवून सांगितले होते. त्यास नकार दिल्याने जवाद याने शिवीगाळ करीत त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. त्यानंतर जवाद शेख याच्याबरोबर असलेल्या मोन्या शेख, अरमान शेख, फरहान शेख,इरशाद शेख व इतरांनी विद्यार्थ्याला महाविद्यालयापासून चौकात मारत आणले. चौकात विद्यार्थ्याच्या डोक्यात, छातीत व नाकावर लोखंडी हत्याराने मारहाण करून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
Mumbai Live: मुंबई मनपाकडून गणेश विसर्जनानिमित्त विशेष आवाहन१) विसर्जनावेळी समुद्राच्या खोल पाण्यात प्रवेश करू नये. २) महानगरपालिकेने निषिद्ध घोषित केलेल्या क्षेत्रात जाण्याचा / पोहण्याचा प्रयत्न करू नये. ३) समुद्र किंवा तलावात कुणी बुडताना आढळल्यास त्वरित पोलिस, मुंबई अग्निशमन दल किंवा जीवरक्षकांना माहिती द्यावी. ४) गर्दीत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांची योग्य काळजी घ्या.
असं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर व स्विफ्ट वाहनांवर किनगांव राजा पोलिसांनी ता.५ सप्टेंबर रोजी कारवाई करून १० लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्यावेळी अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परवर पोलिसांनी कारवाई केली त्यावेळेस लाल रंगाची स्विफ्ट डिझायर गाडीमधून पोलिसांवर पाळत ठेवणाऱ्या स्विफ्ट वाहनावर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे.
Nagpur Live: नागपूरमध्ये विदर्भातील प्रमुख ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक- ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने विदर्भातील प्रमुख ओबीसी कार्यकर्ते, ओबीसी समाजातील राजकीय नेते तसेच ओबीसी वकील महासंघाची बैठक उद्या नागपुरात रवी भवनात १० वाजता पार पडणार आहे.
या बैठकीस ओबीसी नेते विजय वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता किशोर लांबट यांच्यासह विदर्भातील प्रमुख ओबीसी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मराठा समाजाला जीआर काढुन दिलेल्या विषयावर होणार चर्चा, तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून जीआर समजून घेण्यात येणार आहे.
Nashik Live: नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्तनाशिक शहरात यंदाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्ताची तयारी केली आहे. विसर्जन मार्गावर तब्बल ८४ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३ हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच एआय कॅमेऱ्यांचा वापर होणार असून मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग त्यांच्या निगराणीखाली राहणार आहे. मुस्लिम बहुल भागातून मिरवणूक जात असल्याने पोलिसांनी अधिक सतर्कता दाखवली आहे. तसेच, मिरवणुकीदरम्यान लेझर लाइट्सवर बंदी घालण्यात आली असून विसर्जनाला रात्री १२ वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. सर्व उपाययोजनांमुळे मिरवणूक निर्विघ्न पार पडावी, यासाठी नाशिक पोलीस सज्ज आहेत.
Nashik Live: नाशिक : धरणांतून पाण्याचा वाढता विसर्ग, विसर्जनासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारानाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने दारणा व गंगापूर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दारणा धरणातून तब्बल ४६०० क्यूसेक वेगाने पाणी दारणा नदीपात्रात सोडले जात आहे, तर गंगापूर धरणातूनही सकाळपासून २०३० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाढत्या पाणलोटामुळे नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः उद्या होणाऱ्या गणपती विसर्जनावेळी नागरिकांनी नदीकाठ टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करावा अथवा मूर्तीदान कराव्या, असे नगरपालिकेकडून सांगण्यात आले असून, यासाठी २८ नैसर्गिक तर ४९ कृत्रिम तलावांचे नियोजन करण्यात आले आहे.
Latest Maharashtra News Updates Live: अनंत चतुर्दशीसाठी मुंबईत विसर्जनाची जय्यत तयारीअनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर उद्या लाडक्या गणरायाचं विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मुंबई महापालिकेकडून यासाठी विशेष तयारी करण्यात आली असून नागरिकांच्या सोयीसाठी 70 नैसर्गिक विसर्जन स्थळांसोबतच तब्बल 290 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनावेळी गर्दी नियंत्रित ठेवणे, स्वच्छता राखणे आणि आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे यासाठी महापालिकेचे अधिकारी तैनात राहणार आहेत. याशिवाय वैद्यकीय सुविधा, पाणीपुरवठा, लाईटिंग आणि सुरक्षा यासह अनेक सोयी महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत, ज्यामुळे विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडला जाणार आहे.
Latest Maharashtra News Updates Live: मुधोजी राजेंची मुख्यमंत्री फडणवीस यांना मराठा आरक्षणाबाबत ठाम मागणीआज मुधोजी राजे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन दिले. या भेटीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून नव्हे तर ‘मराठा’ म्हणूनच स्वतंत्र आरक्षण दिले गेले पाहिजे. कारण ओबीसी आरक्षणातून हा प्रश्न सुटणार नाही. त्यांनी पुढे म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाला आपला पाठींबा आहे. मराठवाड्यात तब्बल 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या असल्या तरी त्यात अनेक त्रुटी आहेत आणि उर्वरित अंदाजे 2.5 कोटी मराठ्यांचे भवितव्य अजूनही अधांतरी आहे. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाला ‘मराठा’ म्हणूनच सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे, असे ठाम वैयक्तिक मत राजेंनी मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडले.
jalgaon Live: खडकदेवळा येथील हिवरा धरण भरुन ओसांडू लागलेजळगावच्या पाचोर्यातील खडकदेवळा येथील हिवरा धरण १०० टक्के भरुन ओसांडू लागल्याने नदीकाठच्या गावांना दवंडी च्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा.
हिवरा नदीवरील वाडी येथील धरण भरुन ओसांडू लागल्याने त्या पाण्याचा फ्लो हा हिवरा नदीत सुरू असल्याने आज खडकदेवळा येथील हिवरा धरणही भरुन ओसांडू लागले आहे.
शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मुक्ताईनगर शहरात मोकाट जनावरांचा त्रास वाढलाशहरातील मोकाट जनावराचा वावर मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे दुचाकी। स्वार ,तसेच इतर वाहनांची छोटे मोठे अपघात रोज होत आहे त्यात मोकाट गुरेढोरे यांच्यामुळे पादचारी विद्यार्थी यांनाही मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागतो ,. ज्यांचे हे पशुधन आहे त्यांनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरात बस स्टॅन्ड , मुख्य रस्ते, चौकात व इतर ठिकाणी असेच जनावरांचा त्रास नागरिकांना होत असून नगरपंचायत मुक्ताईनगर यांनी लवकरात लवकर त्यांचे नियोजन लावावे. असे निवेदन . नगरपंचायतचे माजी नगरसेवक निलेश शिरसाट यांनी नगरपंचायत चा मुख्य अधिकारी यांना दिले आहे
बोरी धरणाच्या दोन दरवाज्यातून १०५३ क्युसेस पाणी नदीपात्रात विसर्गतामसवाडी तालुका पारोळा येथील बोरी मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी २६७.१० मीटर झाली असून उपयोग उपयुक्त साठा 100% झाला आहे.
तारीख पाच रोजी सकाळी सहा वाजेपासून धरणाचा एक दरवाजा ०.२० मीटर तर दुसरा दरवाजा १५ मीटरने उघडून १०५३ क्युसेस विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
यावेळी विसर्ग काळात नदी काठावरील गावातील ग्रामस्थांना
सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पशुधन व शेती अवजारे
नदीपात्रा जवळ न ठेवता गावात नेण्याचे आव्हान गिरणा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे
पवार कुटुंब सत्तेच्या बाहेर कधीच राहत नाही. जाब विचारण्यासाठी आज मी बारामतीत येतोय. ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार. पवार कुटुंब सत्तेच्या बाहेर कधीच राहत नाही. जीआरमध्ये काय आहे हे पवार, सुळे आणि अजितदादा यांना कळू नये” असं लक्ष्मण हाके म्हणाले.
Nashik Live : नाशिकमध्ये धरणांचा विसर्ग वाढला; नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशाराजिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
दारणा धरणातून तब्बल ४६०० क्यूसेक वेगाने पाणी दारणा नदीपात्रात सोडले जात आहे.
गंगापूर धरणातूनही सकाळपासून २०३० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उद्या गणेश विसर्जनासाठी नदीकिनारी जाणं टाळावं, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करावं अथवा मूर्ती दान कराव्यात, असेही पालिकेचे आवाहन आहे.
यासाठी पालिकेकडून २८ नैसर्गिक आणि ४९ कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे.
Nagpur Live : नागपूरात ईद-ए-मिलाद उत्साहात; कृतज्ञता रॅली, रोषणाई आणि शुभेच्छांचा जल्लोषइस्लाम धर्मात ईद मिलादुनंबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाते..
आज नागपूरात मोठ्या उत्साहात मुस्लीम बांधवांतर्फे ईद - ए - मिलाद नीमित्त विविध ठिकाणी कृतज्ञता रैलीचे आयोजन करण्यात आले होते..
या रॅलीत लहान मुले, नागरीक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे...
विविध परिसरातून काढण्यात येत असलेल्या या मिरवणुकीचे समाजाचा विविध संस्था संघटनांकडून स्वागत केले...
ईद - ए - मिलाद नीमित्त मुस्लीम बांधवांनी आपल्या घरांवर आणी धार्मिक ठिकाणांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे..
आजचा दिवशी मुस्लीम मुस्लीम बांधव एकमेकांना गळा भेट घेऊन शुभेच्छा देतांना दिसून आलेय..
Kolhapur Live : कोडोलीत हृदयद्रावक घटना; 10 वर्षीय मुलाचा आईच्या मांडीवर हृदयविकाराने गेला जीवकोल्हापूरच्या कोडोली मध्ये 10 वर्षीय मुलाला हृदयविकाराचा झटका
आईच्या मांडीवर सोडला जीव
Pune Live : पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणेश विसर्जन मिरवणुकीचे टाईमटेबलमानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुकीच्या वेळेचं नियोजन कसं असेल पाहुया
मानाचा पहिला गणपती कसबा गणपती
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.३० वाजता
बेलबाग चौक: १०.१५ वाजता
कुंटे चौक: ११.४५ वाजता
विजय टॉकीज चौक: १.४० वाजता
टिळक चौक: २.४५ वाजता
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.४५ वाजता
बेलबाग चौक: १०.३० वाजता
कुंटे चौक: १२ वाजता
विजय टॉकीज चौक: १.५५ वाजता
टिळक चौक: ३ वाजता
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १० वाजता
बेलबाग चौक: ११ वाजता
कुंटे चौक: १२.४५ वाजता
विजय टॉकीज चौक: २.३० वाजता
टिळक चौक: ३.३० वाजता
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.१५ वाजता
बेलबाग चौक: ११.३० वाजता
कुंटे चौक: १.३० वाजता
विजय टॉकीज चौक: ३ वाजता
टिळक चौक: ४ वाजता
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.३० वाजता
बेलबाग चौक: १२ वाजता
कुंटे चौक: २ वाजता
विजय टॉकीज चौक: ३.३० वाजता
टिळक चौक: ४.३० वाजता
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
बेलबाग चौक (सुरुवात): ४ वाजता
गणपती चौक: ४.५५ वाजता
कुंटे चौक: ६ वाजता
विजय टॉकीज चौक: ६.३० वाजता
टिळक चौक: ७.३० वाजता
अखिल मंडई मंडळ
बेलबाग चौक (सुरुवात): ७ वाजता
गणपती चौक: ७.२५ वाजता
कुंटे चौक: ८.३० वाजता
विजय टॉकीज चौक: ९.२० वाजता
टिळक चौक: ११.२५ वाजता
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट
बेलबाग चौक (सुरुवात): ६.३० वाजता
गणपती चौक: ६.५५ वाजता
कुंटे चौक: ८ वाजता
विजय टॉकीज चौक: ९.४० वाजता
टिळक चौक: १०.४५ वाजता
Amaravati Live : अमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर सुरक्षा भिंत बांधलीअमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर अखेर सुरक्षा भिंत बांधली....
पूल शिकस्त झाल्याने रेल्वे पुलावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे..
पुलावरून कुठलेही वाहन जाऊ नये यासाठी आता थेट विटांची मजबूत भिंत बांधली आहे...
साठ वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते...
Chandrapur Live: चंद्रपुरात विसर्जनासाठी पोलिस यंत्रणा सज्जविघ्नहर्त्याचे विसर्जन आता काही तासांवर आले आहे. हे विसर्जन शांततेत आणि निर्विघ्न पार पडावे, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.
आज ईद आणि उद्या विसर्जन असे दोन उत्सव लागोपाठ आल्याने पोलिसांनी आज शहरातून रूट मार्च काढला.
नागरिकांना शांततेचे आवाहन केले. विसर्जन लक्षात घेता प्रत्येक मुख्य चौकात मचाण उभारण्यात आली असून, त्यावरून मिरवणुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
फिरते सीसीटीव्ही वाहन, ड्रोन आणि इतर साधनांच्या मदतीने संपूर्ण मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे.
विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी जवळपास बाराशे पोलिस कर्मचाऱ्यांची तैनाती केली जाणार आहे. यात चार एसडीपीओ, 40 पोलिस निरीक्षक आणि 800 पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचा समावेश आहे.
Live: चंद्रपुरमध्ये ईद ए मिलादनिमित्त मुस्लिम बांधवांची मिरवणूकईद ए मिलादनिमित्त चंद्रपूर शहरात मुस्लिम बांधवांनी मोठी मिरवणूक काढली. मैत्री आणि शांतीचा संदेश देत ही मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली. शहरातील विविध भागातून निघालेल्या मिरवणुका मुख्य मिरवणुकीत सहभागी झाल्या. शांततेत पार पडलेल्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणीचोख बंदोबस्त तैनात केला होता.
Live: हृदयविकाराच्या धक्क्याने दहा वर्षीय निरागस मुलाचा दुर्दैवी अंतखेळता खेळता आईच्या मांडीवरच सोडला श्रावण गावडे या मुलाने प्राण
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली इथली हृदयद्रावक घटना, जिल्ह्यात हळहळ
मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात खेळत होता श्रावण गावडे
अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि खेळ सोडून तो आईच्या कुशीत विसावला
मात्र आईच्या मांडीवर डोके टेकवत असतानाच श्रावणला हृदयविकाराचा तीव्र झटका आला
Live: लक्ष्मण हाके बारामती मध्ये दाखल रॅलीला सुरुवात- लक्ष्मण हाके बारामती मध्ये दाखल रॅलीला सुरुवात
- ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा
- बारामतीत आंदोलन लक्ष्मण हाकेंची घोषणा
LiveUpdate: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 16 दिवसांपासून काम बंद आंदोलनराज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या 38 हजार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून संपाचा आजचा सोळावा दिवस आहे. बीड मधील 1400 कर्मचाऱ्यांकडून मागील पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली जात आहेत. दरम्यान या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश एनएचएमच्या आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले आहे. मात्र तरी देखील कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
Baramati LiveUpdate: बारामतीतील ओबीसी मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारलीबारामतीत आज मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे थोड्याच वेळात या मोर्चाला लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे मात्र या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात बारामतीचे उपयोगी पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला आम्ही पुढील तारीख घ्या अशी आंदोलकांना विनंती केली होती म्हणत आम्ही या मोर्चाला परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केल आहे.
LiveUpdate: जीआर निघाल्यावर अभ्यासक निघू लागले- जरांगेमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे बोलले की जीआर निघाल्यावर अभ्यासक निघू लागले.
Laxman Hake Live : बबनराव तायवाडेंनी जीआर समजावून सांगावा- लक्ष्मण हाकेलक्ष्मण हाके यांनी बारामतीत ओबीसी आरक्षण बचावासाठी जाब आंदोलन सुरु केले आहे. यावेळी त्यांनी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी हैद्राबाद गॅझेटबाबत जीआर समजावून सांगावा असे म्हटले आहे.
Mumbai Live : मुंबईत आत्मघाती हल्ला करण्याची धमकीमुंबईत आत्मघाती हल्ला करण्याची धमकीचा मेसेज एका वाहतूक पोलिसाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात असा मेसेज आल्याने मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत.
Sanjay Raut : मुंबईत मराठीच महापौर होणार- संजय राऊतसंजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
solapur Live : एसटी-दुचाकीचा भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी, सोलापुरातील घटनाबार्शीजवळील बायपास येथे एसटी बस आणि दुचाकीचा अपघात
- एसटी बस ओढ्याच्या पुलावरून गेली खाली
- एसटी बस कुर्डूवाडीवरून बार्शीकडे येत असताना तिरकस पुलावरून दुचाकी स्वाराला वाचवताना एसटी बस गेली पुलाखाली
- बार्शी जवळील तिरकस पुलाजवळील घटना
- दुचाकीवरून दूध घेऊन जाणारा व्यक्ती गंभीर जखमी
Solapur Live : माळशिरसच्या धर्मपुरीत पाण्यासाठी महिलांचे आंदोलनमाळशिरसच्या धर्मपुरीत पाण्यासाठी महिलांचे आंदोलन
माळशिरस तालुक्यातील धर्मपुरीत पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
मागील आठ दिवसांपासून भीम नगर परिसरात पाणी पुरवठा बंद आहे.
पाणी पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
Bhandara Live : 7 दिवसांचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करू, जरोंगेंनतर आता बच्चू कडू आक्रमकसरकारला खाली खेचण्याच्या आंदोलनासाठी वर्गणी जमा करा
सात दिवसाचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करू
बच्चू कडू यांनी ओढले राज्य सरकारवर ताशेरे
Nashik Live : नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बर्निंग कारचा थरारनाशिकच्या मुंबई नाका परिसरात बर्निंग कारचा थरार
एका चालत्या कारला अचानक लागली आग
कारमध्ये असलेल्या दोन व्यक्ती वेळीच कारमधून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली
कारमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच कारमध्ये असलेले दोन जण लगेच कारमधून पडले बाहेर
स्थानिक लोकांनी आग विझवण्यासाठी केली मदत
Nandurbar Rain : नंदुरबारमध्ये पुढील २४ तासांत अति मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारीनंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याकडून आजही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रस्ते झाले जलमय झाले असून अनेक दुकानात पाणी गेल्याने नुकसान झाले आहे. पुढील २४ तासांत अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Gaganbawada Ghat : तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्ग १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंदसिंधुदुर्ग : तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्ग १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद आहे. भुईबावडा, फोंडाघाट मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. गगनबावडा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक बंद करण्यात आली.
Athani Robbery : अथणीतील दरोडाप्रकरणी पाच जणांना अटक, सांगली जिल्ह्यातील तिघांचा समावेशबेळगाव : अथणी गावात भरदिवसा दागिन्यांचे दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. विजय ऊर्फ बबलू संजय जावीर (वय ३३, रा. शहापूर, इचलकरंजी), यशवंत ऊर्फ ओंकार गोपीनाथ गुरव (वय २४,, रा. जरंडी, ता. तासगाव, जि. सांगली), हेमंड वांडरे (वय २८, रा. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली), सूरज नानासो बुदावले (वय २५, रा. इचलकरंजी) आणि भरत चंद्रकांत काटकर (वय ३९, रा. वाळवा, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. या पाच संशयितांकडून दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
छगन भुजबळ नाराज नाहीत, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांची माहितीपुणे : ‘‘मंत्रिमंडळाच्या अगोदर घेतल्या जाणाऱ्या बैठकीत छगन भुजबळ स्वतः हजर होते. मराठा आरक्षणाबाबतच्या निर्णयावर ते नाराज नाहीत. त्यानंतरच्या बैठकीवेळी त्यांना अन्य काम असेल. त्यामुळेच ते हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असे नाही. ते आमच्यासोबतच आहेत.’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
MLA Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक अमित सरय्या यांनी भाजपचे कमळ घेतले हातीठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक अमित सरय्या यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात सरय्या यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात पुन्हा विनाशकारी भूकंप, ६.२ तीव्रतेच्या तिसऱ्या धक्क्याने हाहाकारकाबूल : अफगाणिस्तान भूकंपाने पुन्हा हादरला आहे. नुकत्याच झालेल्या भूकंपाच्या धक्क्यातून सावरत असतानाच पुन्हा तिसरा धक्का बसला. गुरुवारी ४ सप्टेंबरला आग्नेय अफगाणिस्तानात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाल्याचे वृत्त आहे. रविवारी अफगाणिस्तानात मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर हा त्याच प्रदेशातील तिसरा भूकंप आहे. रविवारी झालेल्या भीषण भुकंपात २,२०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडलेत.
Chhagan Bhujbal : ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ; फार्महाऊसवर दिवसरात्र कडेकोट बंदोबस्तनाशिक : मराठा आरक्षणप्रश्नी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला वाटा देण्यास स्पष्ट विरोध दर्शविल्यानंतर त्यांच्या फार्महाऊसवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच, गस्ती पथकांकडून दिवसरात्र कडेकोट बंदोबस्त ठेवला जात आहे.
Eid News : ईदची सार्वजनिक सुट्टी आज ऐवजी आठ सप्टेंबरलामुंबई : ईद-ए-मिलादनिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ५ सप्टेंबरला जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी बदलून आता ८ सप्टेंबर करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशी यंदा शनिवारी (ता. ६) असूल्याने हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लिम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Devendra Fadnavis : 'जीआर' सरसकटचा नाही, पुराव्यांचा आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई : मराठवाड्यातील मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन कुणबी जातप्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने नव्याने केलेली सुधारणा म्हणजे सरसकटचा शासननिर्णय (जीआर) नाही, हा पुराव्यांचा ‘जीआर’ आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मराठा आणि ओबीसी समाजात यामुळे दुरावा निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले.
OBC Reservation : ओबीसी आरक्षणास धक्का नाही; मंत्री सावेंच्या आश्वासनानंतर उपोषण मागेLatest Marathi Live Updates 5 September 2025 : मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांतून (ओबीसी) आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात नागपूरमध्ये सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाची गुरुवारी (ता. ४) सांगता झाली. राज्याचे ओबीसी खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी आंदोलकांची भेट घेत महासंघाच्या चौदापैकी बारा मागण्या तत्काळ मान्य केल्या आहेत. तसेच भारताचे नागरिकत्व १९८३ साली मिळविणाऱ्या काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव १९८० साली मतदारयादीत कसे टाकले गेले, याची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर १० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मराठवाड्यातील मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन कुणबी जातप्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने नव्याने केलेली सुधारणा म्हणजे सरसकटचा शासननिर्णय (जीआर) नाही, हा पुराव्यांचा ‘जीआर’ आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला वाटा देण्यास स्पष्ट विरोध दर्शविल्यानंतर त्यांच्या फार्महाऊसवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ईद-ए-मिलादनिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ५ सप्टेंबरला जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी बदलून आता ८ सप्टेंबर करण्यात आली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..