संपूर्ण देशात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. आता पंजाबमधून फसवणुकीची एक विचित्र घटना समोर आली आहे. एक व्यक्ती इंग्लंडचा व्हिसा काढण्यासाठी गेला होता. आपली पत्नी इंग्लंड मध्ये राहते असा दावा त्याने केला होता. मात्र त्याला व्हिसा मिळू शकला नाही. याचे कारण म्हणजे त्या व्यक्तीने ज्या महिलेचा उल्लेख पत्नी म्हणून केला होता, त्या महिलेला आधीच 15 पती आहेत. यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी असं समजलं की, या महिलेच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन 15 लोकांना इंग्लंडमध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र या महिलेला याबाबत कुठलीही कल्पना नव्हती.
समोर आलेल्या माहितीनुसार एका जोडप्याने ही फसवणूक केली होती. पोलिसांनी या आरोपी जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. तसेच इंग्लंडमध्ये राहणाऱ्या त्या महिलेला अटक करण्यात आली आहे, मात्र तिचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर या महिलेचा खरा पती पंजाबमधील राजपुरा येथे राहतो अशी माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणाबाबत अधिक चौकशी केली असता इमिग्रेशन कंपनी चालवणाऱ्या एका जोडप्याने या महिलेच्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. या कागदपत्रांच्या माध्यमातून 15 तरुणांना या महिलेले पती म्हणून इंग्लंडला पाठवण्यात आले. यामुळे पीडित महिलेला इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली. ही माहिती समजताच पीडितेच्या पतीने राजपुरा पोलिसांकडे आरोपी जोडप्याविरुद्ध तक्रार दाखल केली, त्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मुलासह इंग्लंडला जायचे होतेआलमपूरमधीस भिंदर सिंग यांना इंग्लंडला जायचे होते. पत्नी इंग्लंडमध्ये राहते, त्यामुळे मुलासह इंग्लंडला जाण्याचा निर्णय भिंदर सिंग यांनी घेतला होता. यासाठी भिंदर सिंग यांच्या पत्नीने स्पॉन्सरशिप पाठवली होती. भिंदर सिंग यांनी इंग्लंडला जाण्यासाठी इमिग्रेशन कंपनी चालवणाऱ्या जोडप्याकडे ही फाइल दाखल केली. त्यावेळी आरोपीने त्यांच्याकडून 5 लाख 90 हजार रुपये घेतले परंतु काही काळानंतर त्यांना इंग्लंडचा व्हिसा देण्यास नकार दिला होता.
प्रशांत आणि रुबी मुख्य आरोपीया घटनेनंतर भिंदर सिंग यांच्या पत्नीला इंग्लंडमध्ये अटक झाली. त्यावेशी भिंदर सिंग यांना कळले की आरोपींनी त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर केला. तसेच 15 तरुणांना त्यांच्या पत्नीचे पती म्हणून इंग्लंडला पाठवण्यात आले. या प्रकरणाचा तपास केला असता इमिग्रेशन कंपनी ऑपरेटर प्रशांत आणि त्यांची पत्नी रुबी यांनी हे कांड केल्याचे समोर आले. आता पोलिसांनी दोघांविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.