डबल धमाका, वैद्यकीय कंपनीने जाहीर केला लाभांश, Stock Split चीही घोषणा
ET Marathi September 05, 2025 11:45 PM
मुंबई : वैद्यकीय उपकरणे निर्मिती आणि पुरवठा करणारी कंपनी फिशर मेडिकल व्हेंचर्स लिमिटेडने आपल्या भागधारकांना दुहेरी खूशखबर दिली आहे. Fisher Medical Ventures ने लाभांश जाहीर केला. तसेच स्टाॅक स्प्लिटचीही घोषणा केली. कंपनीने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी गुंतवणूकदारांना पहिला अंतिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने प्रति शेअर ०.०५ रुपये dividend जाहीर केला आहे. यासाठी २२ सप्टेंबर २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.



स्टॉक स्प्लिट रेकॉर्ड तारीख


गुंतवणूकदारांना शेअर्स अधिक सुलभ बनवण्याच्या उद्देशाने Fisher Medical Ventures ने stock split ची घोषणा देखील केली आहे. १० रुपयांच्या सध्याच्या दर्शनी मूल्याचा एक शेअर १ रुपये दर्शनी मूल्याच्या १० शेअर्समध्ये विभागला जाईल. कंपनीने या स्टॉक स्प्लिटसाठी १२ सप्टेंबर २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. कंपनी पहिल्यांदाच आपल्या शेअर्सचे विभाजन करणार आहे.



शेअरची कामगिरी


फिशर मेडिकल व्हेंचर्स लिमिटेडचा शेअर्स गुरुवारी बीएसईवर १.४९% वाढून १०९५.७५ रुपयांवर बंद झाला. तर शुक्रवारी शेअर्स १६ रुपयांनी वाढून १,१०६ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने ७६% शानदार परतावा दिला आहे. गेल्या २ वर्षात कंपनीचा शेअर ११३६%, ३ वर्षात १६१२%, ५ वर्षात २४४२% आणि १० वर्षात ३२३१८% वाढला आहे.





© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.