तळेगावात आज प्रेरणादायी सुविचारांचे प्रदर्शन
esakal September 05, 2025 11:45 PM

तळेगाव दाभाडे, ता. ४ ः तळेगावात प्रथमच प्रेरणादायी सुविचारांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे भरविण्यात येणार आहे.
प्रदर्शनात १०८ प्रेरणादायी सुविचार मांडले जाणार असून ते मानवी जीवनातील प्रेम, मैत्री, नातेसंबंध, सुख-दुःख, यश-अपयश, विचार आदी विषयांवर मार्गदर्शन करतील. सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा, मानवी जीवनमूल्यांचे सामर्थ्य समजावून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. धावपळीच्या जीवनशैलीत माणसाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी सकारात्मक विचारांची आणि प्रेरणादायी सुविचारांची गरज भासते. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश साखवळकर उपस्थित राहणार असून, प्रदर्शनाचे आयोजन राजेंद्र पवार यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.