7वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! बॉम्बे हाय कोर्टात अर्ज सुरु
Sarkarnama September 05, 2025 11:45 PM
नोकरीची सुवर्णसंधी!

मुंबई उच्च न्यायालयात भरती सुरू – लवकर अर्ज करा!

संधी गमावू नका

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य शाखेत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे.
नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी गमावू नका.

उमेदवार अर्ज

या भरतीसाठी 7वी / 10वी / 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

उपलब्ध पदे :

स्वयंपाकी नि-शिपाई

पगार श्रेणी

निवड झालेल्या उमेदवारांना 16,600 ते 52,400 पगार मिळणार आहे.

वयोमर्यादा

भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे. अर्ज करताना 300 रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणीद्वारे होणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावरच अंतिम निवड केली जाईल.

अर्ज पाठवायचा पत्ता

मा. प्रबंधक, वेतन व आस्थापना विभाग,
उच्च न्यायालय, मुंबई – 400032
लवकर अर्ज करा आणि सरकारी नोकरीची संधी मिळवा!

Next : महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या कामाचे तास का वाढवले? जाणून घ्या येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.