Public Holiday 2025 : ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे की नाही? महत्वाची माहिती आली समोर
Saam TV September 05, 2025 11:45 PM

ईद-ए-मिलादनिमित्त ५ सप्टेंबरची सुट्टी आता ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार

बदललेली तारीख फक्त मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांसाठी लागू आहे.

इतर जिल्ह्यांमध्ये सुट्टी पूर्वीप्रमाणे ५ सप्टेंबर रोजीच राहणार

मुस्लिम समाजाच्या विनंतीनुसार आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय

Public Holiday 2025 : राज्य सरकारने ईद-ए-मिलादनिमित्त शासकीय सुट्टीच्या तारखेत मोठा बदल केला आहे. शासकीय निर्णयानुसार ५ सप्टेंबर २०२५ रोजीची शासकीय सुट्टी ८ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. या निर्णयानुसार मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आता ईदची सुट्टी ८ सप्टेंबर रोजी मिळणार आहे.

Narayan Rane : मोठी बातमी! भाजप नेते खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, ईद-ए-मिलाद निमित्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार ८ सप्टेंबर रोजी असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.

Narayan Rane : मोठी बातमी! भाजप नेते खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल

शनिवार ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. राज्यात बंधुता आणि हिंदू - मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजीची सुट्टी आता सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.