थोडक्यात:
प्रसूती तीन प्रकारांनी होऊ शकते नैसर्गिक, फोर्सेप/व्हॅक्युम किंवा सिझेरियन प्रत्येक पद्धतीचे फायदे आणि धोके वेगळे असतात.
प्रत्येक बाळंतपण वेगळं असतं, त्यामुळे योग्य प्रसूतीपद्धत ठरवताना डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक असतो.
गरोदरपणात योग्य आहार, तपासण्या व मानसिक तयारी केल्यास बाळंतपण सुरळीत होण्याची शक्यता वाढते.
Natural Birth or C-Section: गरोदरपण 9 महिने 5 दिवस किंवा 40 आठवड्यांचे असते. त्यानंतर बाळाला प्राणवायू व रक्तपुरवठा कमी होऊन धोका उत्पन्न होऊ शकतो. नैसर्गिक कळा न आल्यास औषधे देऊन प्रसवकळा आणण्याचा प्रयत्न केल्या जातो. अर्थात काही बाबी जसे, बाळाची पोझिशन व वजन, गर्भजलाचे प्रमाण, गर्भाशयाचे मुख व प्रसवमार्ग पूरक आहेत का, बाळाचे हृदयाचे ठोके, गरोदरपणातली गुंतागुंत लक्षात घ्याव्या लागतात.
प्रसूती साधारण 3 प्रकारे 1. नैसर्गिक बाळंतपणयात बाळाचा व प्रसूतीमार्गाचा समतोल साधलेला असतो आणि प्रसूतीची पूर्वतयारी नैसर्गिकरीत्या झालेली असते. प्रसूतीकळा काही मिनिटांच्या अंतराने येतात व हळूहळू वाढत जातात. कधी थोडा रक्तस्राव, कधी खूप पाणी जाणे सुरू होते. बाळाचे डोके खाली सरकत आपली जागा घेते. पुढची प्रसूती नंतर सुलभपणे होते.
फायदे:
शारीरिक रिकव्हरी लवकर होते
हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी कमी
पुढच्या गरोदरपणात जास्त गुंतागुंत राहत नाही
बाळाची प्रतिकारशक्ती अधिक चांगली
धोके:
प्रसूतीवेळेत दीर्घकाळ वेदना
काही वेळा बाळ अडकण्याचा धोका
प्रसवमार्ग फाटण्याची शक्यता
Teachers Day 2025: यावर्षीचा टीचर्स डे बनवा एकदम खास; तुमच्या आवडत्या शिक्षकांना द्या बजेट-फ्रेंडली पण हृदयस्पर्शी गिफ्ट्स! 2. फोर्सेप/चिमटा किंवा Ventouse / व्हॅक्यूम प्रसूतीप्रसूतीमार्ग किंचित छोटा वा बाळाचे डोके थोडे मोठे किंवा बाळाची पाठ उजवीकडे असल्यास व बाळाचे डोके अगदी खाली आलेले असल्यास ही पद्धत वापरल्या जाते. चिमटा लावण्याचा अनुभव डॉक्टरला असावा लागतो. व्हॅक्यूम मध्ये विशिष्ट साचा बाळाच्या डोक्याला लावून प्रसूती केल्या जाते. याचे काही धोके असतात; पण नाईलाजाने इमर्जन्सीमध्ये याचा वापर होतो.
फायदे:
बाळाचा जन्म त्वरीत होतो, त्यामुळे गर्भाशयात असलेला तणाव कमी होतो.
आईला धक्का किंवा थकवा जास्त झाल्यास, ही पद्धत उपयोगी ठरते.
बाळाचे हृदयाचे ठोके कमी होत असल्यास वेळेवर हस्तक्षेप करता येतो.
सीझेरियन टाळण्याचा पर्याय मिळतो काही परिस्थितीत
धोके:
आईसाठी:
प्रसूतीमार्ग फाटणे किंवा जास्त रक्तस्राव होणे
पुढील दिवसांत मूत्र विसर्जनाशी संबंधित त्रास
प्रसूतीनंतर वेदना किंवा सूज होऊ शकते
बाळासाठी:
डोक्यावर सूज (Caput succedaneum) किंवा गोलसर डाग
कधी कधी चेहऱ्याच्या स्नायूंवर तात्पुरता परिणाम
क्वचित प्रसंगी डोक्याला किंवा डोळ्यांना दुखापत
3. सिझेरियन ऑपरेशनयात आईला सुंघणी दिली जाते (कमरेच्या मणक्यात किंवा पूर्ण बेशुद्ध करून). पोटाच्या खालच्या भागात आडवा चिरा किंवा बेंबीखाली उभा चिरा दिला जातो. पोटाची अनेक आवरणं काळजीपूर्वक उघडत गर्भाशयापर्यंत जातात.
गर्भाशयाच्या खालच्या भागात आडवा छेद देऊन बाळाला काढले जाते. नाळ कापून प्लॅसेंटा काढल्यावर टाके घालून पुन: बंद केल्या जाते. कुठेही रक्तस्राव नाही, याची काळजी घेऊन पोटाची आवरणं शिवतात. यात उत्तम धाग्यांचा वापर करतात. 9 व्या दिवशी त्वचेचा टाका काढतात. आतले टाके विरघळणारे असतात.
फायदे:
वेदना कमी होतात
काही विशिष्ट गुंतागुंतीत सुरक्षित पर्याय
बाळ व आईच्या आरोग्यास धोका असल्यास उपयुक्त
धोके:
शारीरिक रिकव्हरीस वेळ लागतो
भविष्यातील गर्भधारणेस धोका
टाके, संसर्ग, रक्तस्राव यासारखे धोके
पुढच्या प्रसूतीत सिझेरियन होण्याची शक्यता वाढते
Free Computer Courses: कॉम्प्युटर कोर्स करायचा आहे? मग हे कोर्सेस मोफत शिका! कोणती पद्धत योग्य?प्रत्येक बाळंतपण ही स्वतंत्र घटना असते. यात कोणत्याही टप्प्यावर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. प्रसूती कुठल्या प्रकारे होईल, हे डॉक्टरसुद्धा आधीपासून सांगू शकत नाही. नैसर्गिक प्रसूती व्हावी व कुठलीही गुंतागुंत न होता बाळ व आई सुखरूप असावेत, हेच डॉक्टरचे लक्ष्य असते. सिझेरियनचा निर्णय घेताना पूर्ण माहिती, त्याची कारणे जरूर जाणून घ्यावी. तसेच त्या परिस्थितीत डॉक्टरवरही ताण असतो याची जाणीव ठेवावी.
काळजी घेण्याचे उपायगरोदरपणात नियमित तपासण्या करणे
पौष्टिक आहार घेणे आणि व्यायाम करणे
प्रसूतीपूर्व शिक्षण (Prenatal Classes) घेणे
मानसिक तयारी ठेवणे
आपत्कालीन परिस्थितीची माहिती असणे
FAQs1. नैसर्गिक बाळंतपण का चांगलं मानलं जातं? (Why is natural childbirth considered beneficial?)
नैसर्गिक बाळंतपणामुळे शारीरिक रिकव्हरी लवकर होते, हॉस्पिटलमध्ये कमी वेळ राहावं लागतं आणि पुढच्या गर्भधारणेत गुंतागुंत कमी होते.
2. सिझेरियन ऑपरेशन केव्हा करावं लागतं? (When is a C-section required?)
बाळ किंवा आईच्या आरोग्यावर धोका असेल, बाळ उलट पोझिशनमध्ये असेल, कळा न लागल्यास किंवा इमर्जन्सी स्थिती आल्यास सिझेरियन केला जातो.
3. फोर्सेप किंवा व्हॅक्युम प्रसूती किती सुरक्षित असते? (How safe is forceps or vacuum delivery?)
ही पद्धत अनुभवी डॉक्टरच्या देखरेखीखाली केली जाते; काही धोके असले तरी वेळेवर केलेल्या हस्तक्षेपाने आई-बाळाचं आरोग्य सुरक्षित राहतं.
4. बाळंतपण सुलभ होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? (What care should be taken for a smooth delivery?)
नियमित तपासणी, पौष्टिक आहार, योग्य व्यायाम, प्रसूतीपूर्व शिक्षण व मानसिक तयारी केली पाहिजे.