इलियाना डिक्रूझने सिनेसृष्टीला ठोकला रामराम? पुन्हा अभिनय करण्याबद्दल स्पष्टच म्हणाली-
esakal September 06, 2025 11:45 PM

बॉलीवूड आणि दक्षिणेतील चित्रपटांतून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रुझ सध्या पूर्णपणे मातृत्वाचा आनंद घेत आहे. २०२३ मध्ये पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर, यावर्षी जून महिन्यात तिने दुसऱ्या मुलालाही जन्म दिला. काही महिन्यांतच दोन वेळा आई झाल्यानंतर इलियाना आता दोन्ही मुलांच्या संगोपनात व्यग्र आहे. आता इलियाना पुन्हा अभिनय क्षेत्रात परतणार नाही अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्यावर आता अभिनेत्रीने स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे.

नेहा धुपियाच्या एका लाइव्ह चॅट शोमध्ये बोलताना इलियानाने स्पष्ट सांगितलं की, तिचा आत्ताच्या घडीला सिनेसृष्टीत परतण्याचा विचार नाही. ती म्हणाली, “सध्या मला माझ्या मुलांना वेळ द्यायचा आहे. त्यांना प्रेम द्यायचं आहे. मातृत्वातील आव्हानं आणि आनंद अनुभवायचा आहे. त्यामुळे कमबॅकचा प्रश्नच नाही.” इलियानाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही क्षणही चाहत्यांसोबत शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

सुरुवातीला प्रेग्नंसीची बातमी देताना तिने नवऱ्याचं नाव गुप्त ठेवलं होतं. नंतर तिने पती मायकल डोलनचा परिचय सर्वांना करून दिला. त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव फिनिक्स डोलन, तर दुसऱ्याचं नाव कियानू राफे डोलन असं आहे. सध्या इलियाना कुटुंबासोबत परदेशात स्थायिक आहे.

सिनेसृष्टीला आणखी एक धक्का! अभिनेते आशिष वारंग यांचं निधन; रणवीरसोबत झळकले, छोट्याश्या आजारानं ग्रासलं अन्...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.