राज्यभर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा यांसह प्रमुख मंडळांची मिरवणूक मार्गस्थ.
ढोल-ताशा, टाळ-मृदंग आणि जयघोषांनी संपूर्ण मुंबई दुमदुमली.
पोलिस आणि महानगरपालिका विसर्जन सोहळ्यासाठी सज्ज.
'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या'. या गजरात आज राज्यभरातील गणेशभक्त आपल्या लाडल्या गणरायाला निरोप देतील. १० दिवसांच्या भक्ती, उत्साह आणि आनंदानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मुंबईतही सावर्जनिक मंडळातील गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. तसेच घरगुती गणपतींना देखील आज निरोप दिला जाणार आहे. मुंबईत भव्य दिव्य सोहळ्यासाठी मुंबई पोलीस आणि महानगरपालिका सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आज अनंच चतुर्दशी. राज्यभरात दहा दिवसांच्या गणरायाला मनोभावे निरोप दिला जात आहे. या उत्सवाच्या पारंपारिक सोहळा आणि जल्लोषात मुंबईकर सज्ज झाले आहेत. मुंबईतील गणेशगल्लीतील मुंबईचा राजाही विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
नरेंद्र मोदींना आईवरून शिवीगाळ; भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, त्या रात्री नेमकं काय घडलं?गणेश गल्ली अर्थात मुंबईच्या राजाची सकाळीच आरती झाली. यानंतर विसर्जनासाठी मुंबईचा राजा मार्गस्थ झाला आहे. विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली असून, भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. ढोल ताशांचा गजर, टाळ - मृदंगाचा निनाद, गणरायांच्या घोषणांनी संपूर्ण मुंबई दुमदुमली आहे.
'अजित पवार चोरांचे सरदार', ठाकरे गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप, पाहा VIDEOतेजुकाया सार्वजनिक मंडळ तसेच परळचा राजाची देखील विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली आहे. मात्र, लालबागच्या राजाचे विसर्जन मिरवणूक सकाळी १० वाजेनंतर सुरू होणार आहे. गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबईकरसज्ज झाले असून, आजचा दिवस भावनांचा, भक्तीचा आणि निरोपाचा सोहळा ठरणार आहे.
मोठी बातमी! मुंबईत वेश्या व्यवसायाचा भंडाफोड; पोलिसांनी अभिनेत्रीला रंगेहाथ पकडलं, २ अभिनेत्रींची सुटका