Electricity Supply: २२ तास विजेचा खोळंबा, कल्याणकरांचे हाल
esakal September 07, 2025 04:45 AM

कल्याण : कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुष्पराज हॉटेल मार्ग परिसरातील व्यापारी भाग गुरुवारी (ता. ४) सायंकाळपासून तब्बल २२ तास अंधारात बुडाला होता. वीजवाहिनीत अचानक झालेल्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला. हा पुरवठा शुक्रवार दुपारी ३ वाजेपर्यंत सुरळीत झाला नव्हता.

ऐन सणासुदीच्या काळात वीजपुरवठाबंद राहिल्याने व्यापारीवर्गामध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी दुकाने बंद ठेवून महावितरणविरोधात आपला रोष व्यक्त केला. या वेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महावितरण, पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर वीजवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

Mumbai Local: प्रवाशांची कोंडी निश्चित! मुंबई लोकलकडून मेगाब्लॉकची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

दरवर्षी लाखो रुपयांची वीजबिले भरूनही महावितरणकडून योग्य सेवा मिळत नाही. प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जाते. त्यामुळे आम्हाला तोटा सोसावा लागतो. काही व्यापाऱ्यांच्या दुकानातील मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तूंनाही फटका बसल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी महावितरणचानिषेध व्यक्त केला.

महावितरण अपयशी

वीजबिल नियमित भरूनही व्यापाऱ्यांना मूलभूत सेवा देण्यात महावितरण अपयशी ठरत असून, हे अत्यंत गंभीर असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले. त्यावर नवीन वीजवाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदण्यासाठी आम्ही पालिका प्रशासनाकडे पाच महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे, मात्र त्यांच्याकडून अद्यापही परवानगी मिळाली नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पवार यांना सांगितले.

इंग्रजांनी भारतात अॅलोपॅथी का आणली? पहिले एमबीबीएस मेडिकल कॉलेज कधी सुरू झाले?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.