Srirampur Crime:'नशेच्या इंजेक्शनच्या तस्करीवर धडक कारवाई'; श्रीरामपूरमध्ये वाढते जाळे उघडकीस, तरुणाईसाठी धोक्याचा इशारा
esakal September 07, 2025 04:45 AM

श्रीरामपूर: शहरात नशेच्या औषधांचा वाढता शिरकाव गंभीर चिंता निर्माण करत आहे. तरुणाईला व्यसनाच्या गर्तेत ढकलणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलिसांनी अलीकडे केलेल्या धडक कारवायांना यश मिळत आहे. आज (ता.५) दुपारी साडेबारा वाजता वेस्टर्न सिटी हाउसिंग सोसायटीजवळील खबडी बाबा मंदिराजवळ सापळा रचून पोलिसांनी दोन तरुणांना मेन्फेटमाईन औषध, इंजेक्शन सिरींजेस व अॅक्टिव्हा वाहनासह अटक केली.

Srirampur Crime: 'गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांची कडक कारवाई'; श्रीरामपूरमध्ये सात पिस्तूल जप्त, सहा आरोपी अटकेत

पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली व औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांची नावे अरबाज मस्तान शेख (२३, रा. वॉर्ड क्र.१, श्रीरामपूर) व गौरव रमेश सोनटक्के (२०, रा. दशमेशनगर, श्रीरामपूर) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून मेन्फेटमाईन औषधाच्या सहा बॉटल, आठ इंजेक्शन सिरींजेस आणि सुमारे ६० हजार रुपये किमतीचे होंडा अॅक्टिव्हा ६ जी वाहन जप्त करण्यात आले.

गुप्त बातमीदाराचे जाळे, औषध निरीक्षकांचा समन्वय व पोलिसांची तत्परता यामुळे अलीकडच्या काळात अनेक आरोपी पकडले गेले आहेत. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस येणाऱ्या रॅकेटमुळे या गुन्ह्याचे धागेदोरे राज्याबाहेरपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.

Honesty Employee :'साईंच्या दरबारातील टोकाचा विरोधाभास'; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुक

श्रीरामपूर पोलिसांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मात्र, नशेमुक्त समाजासाठी प्रशासन, पोलिस, शिक्षण संस्था, आरोग्य विभाग आणि नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे; अन्यथा नशेच्या सावटातून पुढील पिढी बाहेर काढणे कठीण ठरेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.