आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी लोपमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मोलाची भूमिका बजावेल
Tv9 Marathi September 07, 2025 04:45 AM

दर्जेदार व परिपूर्ण वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे. याची प्रचिती कोरोना काळात आपल्या सर्वांना आली आहे. चांगले व सुदृध्द आरोग्य हीच माणसांची खरी कमाई असते. त्यामुळे वैद्यकीय सेवेला विशेष महत्त्व आहे. पांढरे कपडे घालून रूग्णाची सेवा करणारा डॉक्टर हा समाजासाठी देवच असतो. म्हणून ‘रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद महत्त्वाचे मानले जाते. त्याच भावनेतून लोपमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले आहे. त्यामध्ये मातांसाठी व बालकांसाठी स्वतंत्र विभाग, आपत्कालीन सेवांसाठी २४ तास तयारी, तसेच हृदयविकार, हाडांचे आजार, स्त्रीरोग आणि इतर शाखांसाठी तज्ञ उपचार या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अशा पायाभूत आरोग्यसेवा उभारल्यामुळे आपल्या भागातील आरोग्याचा दर्जा खरोखरच उंचावेल आणि नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल. त्यामुळे आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी लोपमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास लोपमुद्रा मीरा हॉस्पिटलचे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.अवधूत बोदमवाड यांनी व्यक्त केला.

स्वारगेट परिसरातील लोपमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. गेल्या पन्नासहून अधिक वर्ष वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या मीरा मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलचे रूपातंर नव्याने सुरू झालेल्या लोपमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना दर्जेदार व सुविधांयुक्त सेवा मिळण्याचा मार्ग सुलभ झाला असल्याचे लोपमुद्रा मीरा हॉस्पिटलचे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.अवधूत बोदमवाड यांनी आवर्जून सांगितले. यावेळी लोपमुद्रा ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या ब्रँड अँबेसिडर अभिनेत्री उर्मिला कानेटकर, सीनियर गायनॅकॉलॉजीस्ट डॉ.अरूणा उमराणीकर, डॉ.अर्चना साळवे, डॉ.स्नेहा तिरपुडे, डॉ.संदीप मोरखंडीकर, डॉ.विशाल भस्मे आणि सोनाली बोदमवाड यांच्यासह सिनेसृष्टी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.अवधूत बोदमवाड म्हणाले की, आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी लोपामुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मोलाची भूमिका बजावेल, यात कोणतीही शंका नाही. आधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यांच्या साहाय्याने हे रुग्णालय ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा देईल. आजवर ज्या लोकांना गंभीर आजारांसाठी महानगरांमध्ये जाण्याची वेळ येत असे, त्यांना आता स्थानिक पातळीवरच योग्य उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून, नागरिकांचा आत्मविश्वासही वाढणार आहे. गरीब व गरजू रुग्णांसाठी सवलतीच्या दरात तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट रुग्णालयाने ठेवले आहे. तसेच विविध आरोग्य जनजागृती शिबिरे, मोफत तपासणी मोहिमा आणि रक्तदान शिबिरे आयोजित करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्याविषयी जागरूकता पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल केवळ आजार बरे करणारे ठिकाण राहणार नाही, तर आरोग्य संवर्धनाचे केंद्र बनून समाजहितासाठी काम करेल.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. एखाद्या समाजाचा, एखाद्या राष्ट्राचा विकास केवळ उद्योग, शिक्षण किंवा तंत्रज्ञानाच्या बळावर होत नाही. तर त्या समाजातील लोकांच्या आरोग्यावर त्याचा पाया उभा राहतो. म्हणूनच, आपल्या शहरातच अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होत आहे, ही घटना म्हणजे खरोखरच आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे लोपमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे शहरासह परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार असल्याने एक निरोगी, आत्मनिर्भर आणि सक्षम समाज घडेल. या रुग्णालयात प्रत्येक विभागासाठी वेगवेगळे तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. हृदयरोग, हाडांचे आजार, स्त्रीरोग, बालरोग, शस्त्रक्रिया अशा अनेक शाखांसाठी इथे उत्तम सेवा देण्यात येईल. यामुळे नागरिकांना उपचारासाठी धावाधाव करण्याची आवश्यकता उरणार नाही. अपघातग्रस्त किंवा गंभीर रुग्णांना तातडीची २४ तास सेवा मिळेल, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ग्रामीण आणि शहरी अशा सर्व स्तरांतील लोकांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचेही डॉ.अवधूत बोधमवाड यांनी आवर्जून स्पष्ट केले.

या निमित्ताने बोलताना उर्मिला कानेटकर यांनी सांगितले की, दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आजची मोठी गरज आहे. शहरासह खेड्यापाड्यांतील रुग्णांना देखील उच्च प्रतीची वैद्यकीय सोय मिळाली पाहिजे, हेच या रुग्णालयाच्या स्थापनेमागचे ध्येय आहे. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ उपलब्ध आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी २४ तास आपत्कालीन सेवा, हृदयरोग, बालरोग, स्त्रीरोग, हाडांचे आजार, तसेच शस्त्रक्रियांसाठी वेगळे विभाग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे शहर व आसपासच्या परिसरातील रुग्णांना चांगला फायदा होईल. याप्रसंगी बोलताना डॉ.अर्चना साळवे म्हणाल्या की, स्त्रीरोग उपचार पद्धती आणि आय वी एफ ट्रीटमेंटसाठी अत्याधुनिक ट्रीटमेंटच्या सहाय्याने उपचार पद्धती उपलब्ध करून देणार आहोत.‌ तसेच ऍलर्जी आणि फुफुसाच्या आजारावर तज्ञ डॉक्टर्स आणि तंत्रज्ञान अधिक मदत करेल, असे डॉ.स्नेहा तिरपुडे यांनी सांगितले. हे हॉस्पिटल मणक्याच्या आणि मेंदूच्या आजारावर मदत करेल, असे डॉ.विशाल भस्मे यांनी सांगितले. तर किडनी आणि गंभीर आजारावर या हॉस्पिटलमध्ये उच्च व दर्जेदार पध्दतीने उपचार केले जातील, असे डॉ.संदीप मोरखंडीकर यांनी सांगितले.

दरम्यान, ‘निरोगी समाज, हाच समृद्ध समाज’ यावर आमची श्रध्दा आहे. त्यामुळे ही प्रशस्त व अत्याधुनिक इमारत म्हणजे हजारो लोकांसाठी आशेचा किरण ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे. कारण, हॉस्पिटलचे उदिष्ट फक्त वैद्यकीय सेवा देणे नाही, तर सामाजिक बांधिलकी जोपासणे सुध्दा आहे. त्यामुळे लोपमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्थापनेमुळे नागरिकांना एक विश्वासार्ह व अत्याधुनिक आरोग्यसेवेचे व्यासपीठ मिळाले आहे. म्हणून या रुग्णालयामुळे आपल्या शहराच्या वैद्यकीय विकासाला चालना मिळेल. त्यामुळे येथील दर्जेदार व परिपूर्ण सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असेही आवाहन लोपमुद्रा मीरा हॉस्पिटलचे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.अवधूत बोदमवाड यांनी केले.

…तर डॉ.अवधूत बोदमवाड यांच्या कष्टाचे झाले चीज!

लहानपणापासून संघर्षाचा वारसा घेऊन वाढलेले डॉ.अवधूत बोधमवाड हे नाव आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संकटे, अडचणी आणि अनेक आव्हाने त्यांच्यासमोर उभी राहिली, पण हार न मानता त्यांनी शिक्षण आणि मेहनत या दोन शस्त्रांच्या बळावर आपली वाटचाल सुरू ठेवली. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवासात कितीही अडथळे आले तरी त्यांचा निश्चय ढळला नाही. परिस्थितीला पराभूत करून ते डॉक्टर झाले आणि समाजाला सक्षम आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या जीवनप्रवासातील हा टप्पा म्हणजे त्यांचे केवळ वैयक्तिक यश नाही, तर संघर्षावर मात करून कष्टाला योग्य न्याय मिळाल्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना उपस्थितांमध्ये ऐकायला मिळाली.

…म्हणून हजारो तरूणांना प्रेरणा मिळेल!

लोपमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या रूपाने डॉ.अवधूत बोदमवाड यांच्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळाला आहे. बालपणापासून सुरू झालेला संघर्ष, कष्टाचे घामाने ओले झालेले दिवस आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत यातून त्यांच्या जीवनाला नवी ओळख मिळाली आहे. त्यांनी अंधारातून दोन पावलं पुढे टाकण्याची जिद्द दाखवली, म्हणून ते उजेडाच्या दिशेने चार पावले पुढे आले आहेत. त्यांच्या निश्चय, त्याग आणि परिश्रमामुळे हे हॉस्पिटल उभे राहिले आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरातील रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. त्यांच्या मेहनतीने उभारलेल्या या आरोग्य मंदिरामुळे अनेकांना नवे जीवन मिळेल, हीच त्यांच्या कष्टांची खरी कमाई असेल. संघर्षाच्या वाटेवरून आलेल्या या यशामुळे डॉ.बोदमवाड यांच्या आयुष्याची ही संघर्षमय कथा हजारो तरुणांना प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास लोपमुद्रा ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या ब्रँड अँबेसिडर अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.