Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहण किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या वेळ, रात्रीचे 3 तास 28 मिनिट अत्यंत..
Tv9 Marathi September 07, 2025 01:45 PM

आज चंद्रग्रहण होणार असून हे ग्रहण भारतात देखील दिसणार आहे. या पूर्ण चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास ​​28 मिनिटे 2 सेकंद आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी धृति योग तयार होईल. लोकांमध्ये या चंद्रग्रहणाबद्दल कमालीची उत्सुकता बघायला मिळतंय. आजचे चंद्रग्रहण रात्री 9:58 वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण आहे. पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ते पूर्ण ग्रहणापेक्षा मोठा भाग व्यापते. पूर्ण ग्रहण रात्री 11  वाजता सुरू होईल. कमाल ग्रहण रात्री 11:42 वाजता असेल. आपण रात्रीच्या वेळी हे ग्रहण बघू शकतो. चंद्रग्रहणाच्या वेळी रात्री काही काळोखा पसरण्यााची दाट शक्यता आहे.

हे चंद्रग्रहण फक्त भारतच नाही तर पूर्व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, चीन, जपान या देशांमध्येही दिसणार आहे. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे, ज्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होते. मात्र, धार्मिक गोष्टींमध्येही ग्रहणाला महत्व आहे. यादरम्यान पूजा न करणे, जेवण न करणे, गरोदर महिलेने बाहेर न निघणे हे देखील सांगितले जाते.

7 सप्टेंबर 2025 रोजीचे हे वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण भारतातील अनेक भागात दिसणार आहे. हे ग्रहण रात्री 9:58 वाजता सुरू होईल आणि पहाटे 1:26 पर्यंत चालेल. यादरम्यान चंद्रामध्ये आपल्याला मोठे बदल होताना दिसतील. काही वेळ अंधार देखील पडेल. या चंद्रग्रहणाचा प्रभाव हा काही राशींवर पडण्याची देखील दाट शक्यता असल्याचे सांगितले जाते. काही लोक ग्रहणाच्या काळात जप सुरू करतात.

शतभिषा आणि पूर्वभाद्रपद नक्षत्रांच्या संगमावर होईल. त्यावेळी चंद्र कुंभ राशीत असेल. हे ग्रहण वृषभ, कन्या, मकर राशीच्या लोकांसाठी काहीसे प्रतिकूल असेल, असे सांगितले जात आहे. आपण मोबाईलमध्ये या चंद्रग्रहणाचे क्षण टीपू शकता. उघड्या लोकांनी चंद्रग्रहण पाहू शकता. आजच्या दिवस हा खगोलशास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. अनेक गोष्टींचे ते संशोधन करतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.