आयटीआर रिटर्न करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख, लवकर दाखल करा नाहीतर भरावा लागेल मोठा दंड
Tv9 Marathi September 08, 2025 09:45 AM

इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणे हा प्रत्येक पगारदार तसेच कमाई करणाऱ्या व्यक्तीसाठी अनिवार्य आहे. तर या माध्यमातून तुमच्या कायदेशीर जबाबदाऱ्या पुर्ण हाेत नाही तर तुम्हाला पगारातून कापलेला परतावाही परत मिळतो. अशातच आयकर रिटर्न (ITR) भरणाऱ्यांसाठी एक अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, आता तुमच्याकडे 15 दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही अद्याप रिटर्न भरला नसेल तर त्यात तुम्ही उशिरा ITR भरल्यास दंड आणि व्याज आकराला जाऊ शकतो.

त्यातच आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आतापर्यंत दाखल केलेल्या आयटीआरची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मीही नाही. आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, 25 ऑगस्टपर्यंत फक्त 3.68 कोटी रिटर्न दाखल झाले आहेत.

यापैकी सुमारे 3.54 कोटींची पडताळणी करण्यात आली आहे आणि 2.30 कोटींची प्रक्रिया करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षी संपूर्ण आर्थिक वर्षात 9 कोटींहून अधिक रिटर्न दाखल करण्यात आले होते. याचा अर्थ असा की कोट्यवधी लोकांना अजूनही आयटीआर दाखल केलेला नाहीये.

तज्ज्ञांचे मते आयकर रिटर्न भरणाऱ्यांनी लवकर आयटीआर भरावा, अन्यथा शेवटच्या दिवसांमध्ये मोठी समस्या उद्भवू शकते. कारण, जेव्हा लोकं शेवटच्या तारखेची वाट पाहतात आणि मग घाई करतात. त्यामुळे शेवटच्या तासात ऑनलाईन फायलिंगसाठी गर्दी करतात. त्यामुळे करदात्यांना सर्व्हर डाउनसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

पूर्वी ३१ जुलै ही अंतिम तारीख होती

सरकारकडून यंदा कर भरण्याची अंतिम मुदत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी शेवटची तारीख 31 जुलै होती, जी आता 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही अंतिम मुदत अशा करदात्यांसाठी आहे ज्यांना ऑडिटची आवश्यकता नाही. म्हणजेच, बहुतेक पगारदार वर्गातील लोकांना या तारखेपर्यंत आयटीआर दाखल करावा लागतो. ज्या करदात्यांना ऑडिट करायचे आहे त्यांच्यासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर ही होती.

जर आपण आकडेवारी पाहिली तर देशात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 31 मार्च 2025 पर्यंत, 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 10,814 लोकांनी रिटर्न दाखल केले. त्याच वेळी 5 ते 10 कोटी उत्पन्न असलेल्या 16,797 लोकांनी आणि 1 ते 5 कोटी उत्पन्न असलेल्या सुमारे 2.97 लाख लोकांनी आयटीआर दाखल केला.

१२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही

कर स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. पगारदार लोकांना 75,000 रुपयांची मानक वजावट देखील मिळेल. म्हणजेच 12.75 लाख रुपयांपर्यंतचे एकूण उत्पन्न करमुक्त असेल. तसेच 20 ते 24 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या लोकांवर 25% कराचा नवीन स्लॅब लागू होईल.

अशातच आयकर विभाग तुमच्या प्रत्येक मोठ्या व्यवहारावर लक्ष ठेऊन असते. तुमच्या खात्याची माहिती बँकेमार्फत कर विभागाकडे पोहोचते. समजा, जर तुम्ही तुमच्या बचत खात्यात 10 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली किंवा मोठी एफडी-आरडी रोखीने केली तर त्याची माहिती थेट कर विभागाकडे जाते. त्यामुळे प्रत्येक करदात्यासाठी आयकर रिटर्न भरणे आवश्यक असून सरकारला तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे आणि तुम्ही त्यावर योग्य कर भरला आहे की नाही याची माहिती मिळते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.