Marathi Serial : 'असा' होणार थोडं तुझं थोडं माझं मालिकेचा शेवट ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "मालिका असावी तर अशी !"
esakal September 08, 2025 02:45 PM
  • थोडं तुझं थोडं माझं ही स्टार प्रवाहवरील मालिका दोन दिवसांत संपणार आहे.

  • शेवटच्या भागात गायत्रीचा भूतकाळ आणि तिच्या वडिलांशी संबंधित रहस्य उघड होतं.

  • तेजस आणि मानसी गायत्रीचे वडील सोडवून आणतात आणि त्यातून गायत्री व तिच्या वडिलांचे खरे हेतू सगळ्यांसमोर उघड होतात.

  • Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील थोडं तुझं थोडं माझं ही मालिका सध्या चर्चेत आहे. ही येत्या दोन दिवसात संपते आहे. मालिकेत सध्या खूप महत्त्वपूर्ण ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेचा शेवट कसा होणार जाणून घ्या.

    मालिकेत सध्या पाहायला मिळत आहे की, गायत्रीचा भूतकाळ सगळ्यांसमोर आला आहे. त्यासाठी तेजस आणि मानसी गायत्रीच्या वडिलांना सोडवून आणतात. गायत्री आणि तिच्या वडिलांचे खरे हेतू सगळ्यांसमोर उघड होतात.

    प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, गायत्रीचे वडील तिच्या मुलाला पकडतात आणि त्याच्या गळ्याला काचेचा तुकडा लावून तेजसने घराच्या कागदावर सह्या केल्या नाही तर त्याला मारून टाकेन असं म्हणतात. तेजस बंटीसाठी सह्या करायला तयार होतो. तेव्हा गायत्रीला तिच्या चुकीची जाणीव होते. ती वडिलांचं पिस्तूल घेऊन त्यांच्यावर रोखते आणि तेजसला सह्या करण्यापासून थांबवते. पोलीस गायत्रीच्या वडिलांना अटक करतात. तर मानसी सगळ्यांसमोर तेजसवरील प्रेम व्यक्त करते आणि त्याला मिठी मारते.

    View this post on Instagram

    A post shared by Star Pravah (@star_pravah)

    मालिकेचा शेवटचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत. "बरं झालं वेळेत संपवली मालिका...short but sweet","ही best serial आहे वेळेत आणि खुप छान वळणावर संपवली उगाच फालतूपणा दाखवून लांबवली नाही इतर सीरियल सारखी खुप छान serial आहे forever hit in our heart","आम्ही तेजसची कॉमेडी मिस करू","खूप छान शेवट केला" अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.

    मालिकेचे अखेरचे भाग 11 आणि 12 सप्टेंबर रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका थोडं तुझं थोडं माझं फक्त स्टार प्रवाहवर.

    FAQs : 1. थोडं तुझं थोडं माझं मालिका कधी संपते आहे?
    येत्या दोन दिवसांत या मालिकेचा शेवट होणार आहे.

    2. मालिकेत सध्या काय दाखवलं जातंय?
    गायत्रीचा भूतकाळ उघड होतो आहे.

    3. गायत्रीचे वडील कोण घेऊन येतात?
    तेजस आणि मानसी त्यांना सोडवून आणतात.

    4. मालिकेच्या शेवटी काय उघड होतं?
    गायत्री आणि तिच्या वडिलांचे खरे हेतू सगळ्यांसमोर येतात.

    5. मालिकेच्या शेवटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता कशामुळे आहे?
    कारण शेवटच्या भागात रहस्य उलगडतं आणि कथा पूर्णविरामाला जाते.

    'माझी तुझी रेशीमगाठ 2 ?' श्रेयस- प्रार्थना यांनी एकत्र घेतलं स्वामींचं दर्शन; एकत्र बघून प्रेक्षकांमध्ये चर्चा
    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.