'लोकांना वाटणारी केमिस्ट्री आमच्यासाठी...' जेनिलियाचा फोटो पोस्ट करत रितेशनं व्यक्त केलं प्रेम, म्हणाला...
esakal September 08, 2025 09:45 AM

1 रितेश देशमुख आणि जेनिलियाचा नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल.

2 रितेशनं खास कॅप्शन देत जेनिलियाबद्दल प्रेम व्यक्त केलं.

3 चाहत्यांसह सेलिब्रिटींकडूनही दोघांच्या नात्याचं कौतुक.

सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जेनिलिया यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या जोडीचे अनेक चाहत्यांना आकर्षक आहे. महाराष्ट्राची सून म्हणून देखील जेनिलियाला ओळखलं जातं. दोघांच्या साधेपणामुळे त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. जेव्हा जेव्हा दोघे एकत्र दिसतात, त्यावेळी त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात.

अनेक व्हिडिओमध्ये एकमेकांप्रती प्रेम, आपुलकी, काळजी, आदर सगळं काही पहायला मिळते. सगळ्यांसमोर सुद्ध ते एकमेकांची काळजी घेताना दिसतात. अनेक चाहते त्यांना दादा-वहिनी या नावाने सुद्धा हाक मारतात. दोघेही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ते चाहत्यांचं मनोरंजन सुद्धा करताना दिसत असतात.

अशातच आता रितेशने जेनिलियासोबत एक फोटो शेअर केलाय. इन्स्टाग्राम अकाऊंटवरवर त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. यावेळी त्याने जेनिलियासाठी खास कॅप्शन सुद्धा लिहलं आहे. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जेनिलियाने काळ्या रंगाचा वनपीस परिधान केलाय. तर रितेश व्हाईट रंगाच्या शर्टसह जॅकेट घातलाय. चाहत्यांनाकडून त्याच्या फोटोला पसंती येताना पहायला मिळतेय.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेशनं व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन लिहलय की, 'काही जण याला केमिस्ट्री म्हणतात. पण आम्ही याला हास्य म्हणतो' असं कॅप्शन त्याने दिलय. त्याचा फोटोला नेटकऱ्याच्या प्रचंड कमेंट्स येताना पहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा कमेंट्स करत दोघांच्या फोटोचं कौतूक केलय. सध्या त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

FAQs

रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख कधी विवाहबंधनात अडकले?

3 फेब्रुवारी 2012 रोजी.

जेनिलियाला ‘महाराष्ट्राची सून’ का म्हणतात?

रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर ती मराठी चाहत्यांची आवडती सून झाली.

सध्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये जेनिलियाने कोणता ड्रेस घातला आहे?

काळ्या रंगाचा वनपीस.

रितेशने फोटोला कोणते कॅप्शन दिलं आहे?

"काही जण याला केमिस्ट्री म्हणतात, पण आम्ही याला हास्य म्हणतो."

'तू स्वतःला काय समजतेस?', बिग बॉस 19'मध्ये फरहाना भट्टवर सलमान खानचा संताप: म्हणाला 'मी तुम्हाला राग आणू का?'
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.