कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.
सामंत बंधूंनी शिंदे गटाची ताकद वाढवलीय.
अनेक सरपंच, शिवसैनिक, पदाधिकारी शिंदे गटात दाखल.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागणार आहेत. त्यानुसार राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिंदे गट शिवसेनेने राज्यभरात आपली ताकद वाढवलीय. विशेषत: कोकणात ताकद वाढवत ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. शिंदे गटातील मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू आमदार किरण सामंत यांनी जबरदस्त अॅक्टिव्ह झालेत. त्यांनी तेथे ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडलंय.
दोन्ही भावांनी कोकणाचा मोर्चा संभाळत पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग करून घेतलीय. सामंत ॲक्शन मोडवर आलेत. काही महिने त्यांचे प्रत्येक गावात दौरेही सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लक्षात घेत त्यांनी नेटवर्क मजबूत करण्यास सुरुवात केलीय. मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटावर किरण सामंत जातीने लक्ष दिलंय.
सामंत बंधूंनी गणपती दर्शन कार्यक्रमाच्या निमित्त साधत अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतलाय. लांजा राजापूर साखरपा मतदारसंघातील ताम्हणे सौंदरकरवाडी व ताम्हाणे वरचीवाडीतील ठाकरे गटातील ताम्हणे सरपंच समीक्षा बावस्कर यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र सावंत, शाखाप्रमुख भाई अडसूळ यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. पाचल विभागातील उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केलाय.