अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल.
अमोल मिटकरी यांनी सुरुवातीला अंजना कृष्णा यांच्या चौकशीची मागणी केली.
त्यानंतर मिटकरी यांनी यू-टर्न घेत दिलगिरी व्यक्त केली.
राज्यात आयपीएस अधिकार अंजना कृ्ष्णा यांच्या नावाची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकार अंजना कृष्णा यांचे फोन संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजना कृष्णा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी थेट आयपीएस अधिकारी यांच्या शिक्षणाची चौकशी करावी अशी मागणी केली होती. आता त्यांनी मिटकरी यू- टर्न घेतलाय.
सोशल मीडियावर पोस्ट करत अमोल मिटकरी यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. सोलापूर घटनेसंदर्भात केलेली पोस्ट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती, तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलीस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे.
IPS अंजना कृष्णा प्रकरण पंतप्रधान मोदींकडे; कडक कारवाई करा,सुप्रिया सुळेंची मागणी