Kej News : मराठा आरक्षण विजयी मिरवणुकीत तरुणाचा भोवळ आल्यामुळे मृत्यू
esakal September 07, 2025 04:45 PM

केज (जि. बीड) - मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणाचा भोवळ येऊन मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. चार) रात्री उशिरा घडली. विष्णू हनुमंत रोमन (वय २०) असे त्याचे नाव आहे.

विष्णू रोमन हा मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभागी होता. जरांगेंसोबत मोठ्या संख्येने समाजबांधव मुंबईला गेले होते. जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर गावी परतलेल्या तरुणांची ठिकठिकाणी विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

बेंगळवाडी (ता. केज) येथे गुरुवारी काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत विष्णू रोमन हा सहभागी होता. मिरवणुकीत नाचत असताना त्याला भोवळ आली. ग्रामस्थांनी त्याला तातडीने बाजूला घेतले, परंतु त्याचा मृत्यू झाला. या घटनेने बेंगळवाडीत शोककळा पसरली. विष्णू रोमनच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. पाच) बेंगळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.