लालबागचा राजाच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर हिट अँड रन; भरधाव वाहनाने मुलांना चिरडलं; 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Saam TV September 07, 2025 04:45 PM
  • लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

  • ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, केईएम रुग्णालयात उपचार सुरू

  • अज्ञात वाहनचालकानं मदत न करता घटनास्थळावरून पलायन केलं

  • काळाचौकी पोलिस ठाण्यात हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल

वैदेगी काणेकर, साम टिव्ही

मुंबईतील लालबाग परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर, ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. ही ह्रदयद्रावक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

अज्ञात व्यक्ती भरधाव वाहनाने विरूद्ध दिशेनं आला. त्या व्यक्तीने झोपलेल्या मुलांना धडक दिली. या धडकेत चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत जागीच मृत्यूमुखी पडली. तर जखमी मुलावर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी पहाटे ३ ते ४च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती पोलिसांना दिली. चंद्रा वजणदार असे मृत मुलीचे नाव आहे. तर, शैलू वजणदार असे गंभीर जखमी असलेल्या मुलाचे नाव आहे. दोन्ही मुले लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध असलेल्या रस्त्याच्या कडेला झोपले होते.

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

अज्ञात व्यक्ती भरधाव वाहन घेऊन विरूद्ध दिशेनं आला. त्यानं रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मुलांच्या अंगावरून गाडी नेली. यात भंयकर अपघातात दोन्ही चिमुकले चिरडले गेले. या अपघातानंतर परिसरातील लोकांनी जखमी मुलांकडेधाव घेतली. तसेच त्यांना जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल केले.

लालबागचा राजाच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर हिट अँड रन; भरधाव वाहनाने मुलांना चिरडलं; 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

डॉक्टरांनी २ वर्षीय चिमुकलीला मृत घोषित केले. तर, ११ वर्षीय मुलावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अज्ञात व्यक्तीने मात्र, कोणतीही वैद्यकिय मदत न देता तेथून पसार झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 106, 125(इ), 281, 184,187 (बी.एन.एस) 2023 भा न्या सं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नरेंद्र मोदींना आईवरून शिवीगाळ; भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, त्या रात्री नेमकं काय घडलं?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.