शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे विसर्जनावेळी तीन तरुण वाहून गेले.
रात्री उशिरा एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
दोन तरुणांचा अजूनही शोध सुरू असून मुसळधार पावसामुळे अडचणी आहेत.
या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
शहापूर तालुक्यातील आसनगाव परिसरातील मुंडेवाडी येथे काल संध्याकाळी गणपती विसर्जनावेळी दुर्दैवी घटना घडली. दहा दिवसांच्या गणपतींच्या विसर्जन करण्यासाठी तरुण मंडळी भारंगी नदीकाठी गेली होती. मात्र, विसर्जन सुरू असतानाच नदीला अचानक पाण्याचा जोरदार लोट आला आणि तीन तरुण वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जीवरक्षक टिमला तातडीने माहिती देण्यात आले. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह अतिशय तीव्र होता, त्यामुळे शोधकार्य करताना टीमसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. अखेर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधमोहीमेत एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात टीमला यश आले. मात्र उर्वरित दोन तरुणांचा काहीच मागमूस लागला नाही.
Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यूआज सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा हरवलेल्या दोघा तरुणांचा शोध घेण्यासाठी जीवरक्षक टिम सक्रिय झाली आहे. मात्र भारंगी नदी अजूनही ओसंडून वाहत असल्याने शोधमोहीमेला अडथळे येत आहेत. प्रशासनाकडून अधिक बोटी व पथके या मोहिमेत सहभागी करण्यात आली आहेत. स्थानिक ग्रामस्थांनीही शोधकार्यात मदत सुरू केली आहे.
Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉकया घटनेने परिसरातील लोकांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतदेह बाहेर आलेल्या एका तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.
Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?या घटनेने पुन्हा एकदा गणेश विसर्जनावेळी सुरक्षा उपायांची गरज अधोरेखित केली आहे. दरवर्षी अशा दुर्घटना घडत असून यावेळीही तीन तरुणांचे आयुष्य अकाली संपुष्टात आल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.