Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?
Saam TV September 08, 2025 01:45 PM
  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल.

  • तक्रार मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकाकडून दाखल झाली.

  • मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून संघर्ष.

संजय जाधव, साम प्रतिनिधी

मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानं राज्यातील ओबीसी नेते आक्रमक झालेत. ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी ओबीसी नेते मोट बांधत आहेत, जागोजागी आंदोलन करत आहेत. आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी सराकरच्या विरोधात रणशिंग फुकले आहे. दरम्यान ओबीसीसाठी लढा देणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आलीय. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकाने ही तक्रार दाखल केली आहे.

IPS अंजना कृष्णा प्रकरण पंतप्रधान मोदींकडे; कडक कारवाई करा,सुप्रिया सुळेंची मागणी

मुंबईत मंत्रिमंडळ उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्या हाती आरक्षणाबाबतचा शासन निर्णय सोपविल्यावर राज्यात ओबीसी मराठा वाद सुरू झालाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणविषयक शासन निर्णयाची प्रत फाडल्यावर वातावरण चांगलेच तापले आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत.

IPS Anjana Krishna: करमाळ्यात IPS अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक, व्हिडिओ व्हायरल

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणविषयक शासन निर्णयाची (अध्यादेशाची) प्रत फाडल्यावर वातावरण चांगलेच तंग झाले आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे. दूरवरचा बुलढाणा जिल्हादेखील याला अपवाद ठरला नाहीये. लक्ष्मण हाके यांच्यावर याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करणारी लेखी तक्रार करण्यात आलीय.

Maratha Reservation: मराठा समाज अधिकृत ओबीसीत, भुजबळांच्या विरोधावर जरांगेंचा पलटवार का करण्यात आली तक्रार

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिसात ही तक्रार करण्यात आलीय. हाकेंविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रारकर्त्याची मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे दोन समाजात तेढ निर्माण होईल. राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल, असे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सोबतच शासनाने काढलला अध्यादेश त्यांनी फाडला. त्यांनी संविधानाचाही अवमान केला आहे.. त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मराठा आंदोलकाने केलीय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.