चास, ता. ७ ः आखरवाडी (ता. खेड) येथे ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच निलम मुळूक यांच्यासह भाऊसाहेब बोऱ्हाडे, सागर बोऱ्हाडे, आकाश बोऱ्हाडे, अतुल रोडे, सर्वज्ञ बोऱ्हाडे, अन्वी बोऱ्हाडे यांसह उपस्थित ग्रामस्थांनी प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन केले. यानंतर आयुष बोऱ्हाडे यांनी राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती दिली. यावेळी उपसरपंच दत्तात्रय मुळूक, चास सोसायटीचे अध्यक्ष अशोक मुळूक, पोलिस पाटील नवनाथ मुळूक, माजी उपसरपंच गोविंद मुळूक, सोसायटी संचालक राघू मुळूक, समीर मुळूक, बबन मुळूक, अमर मुळूक, वसंत मुळूक, गणेश गायकवाड, अर्चना बोऱ्हाडे, कोमल बोऱ्हाडे, सुनीता बोऱ्हाडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र मुळूक यांनी केले. तर, सरपंच निलम मुळूक यांनी आभार मानले.