कोकणातील सडे रानफुलांनी बहरले
esakal September 09, 2025 06:45 AM

rat७p१.jpg-
P२५N८९९३०
संगमेश्वर- कोकणातील सडे रानफुलांनी बहरले.
----
कोकणातील सडे रानफुलांनी बहरले!
वाऱ्याच्या लहरीवर रानफुले डोलू लागली.
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ ः कोकणातील सडे सध्या निसर्गाच्या अनुपम सौंदर्याने नटलेले आहेत. पावसाळ्याच्या आगमनानंतर डोंगरदऱ्यांत आणि पठारांवर सोनवी, निळी फुले आणि इतर रंगीबेरंगी वनफुले उमलली आहेत. या नैसर्गिक सौंदर्याने परिसर नखशिखांत सजला आहे. जैवविविधतेचा हा नजारा पर्यावरणप्रेमींना भुरळ घालणारा ठरत आहे.
फुलांच्या बहरामुळे अनेक प्रकारच्या मधमाशा, फुलपाखरं आणि इतर परागी कीटकांची वर्दळ दिसून येत आहे. जैवविविधतेचा हा नजारा पर्यावरणप्रेमींना भुरळ घालणारा ठरत आहे; मात्र, एवढ्या सुंदर दृश्यांची प्रसिद्धी अद्याप पुरेशी झालेली नाही त्यामुळे पर्यटनक्षेत्र अजूनही मागेच आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ सांगतात की, या भागात नैसर्गिक फुलांचे दर्शन वर्षातून केवळ काही आठवड्यांसाठीच होते. त्यामुळे योग्य नियोजन आणि प्रसिद्धीमुळे हा सडा विकसित केला जाऊ शकतो. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, ‘फुलांच्या या हंगामी बहरामध्ये जैवविविधतेचा खजिना लपलेला आहे. जर योग्य पद्धतीने इकोटुरिझमचा विकास केला गेला तर स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात आणि पर्यावरणही जपले जाईल.’ प्रशासनाने आणि पर्यटन विभागाने या भागातील नैसर्गिक सौंदर्याची दखल घेऊन येथे मूलभूत सुविधा व माहिती केंद्रे उभारावीत, अशी मागणी होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.