डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात मध्यस्थी करण्यास सुरूवात केली आणि हे युद्ध अधिकच भडकले. रशियाने युक्रेनच्या कीव शहरावर हल्ला करत थेट सरकारी इमारतींना टार्गेट केले. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी धमकी ही रशियाला दिलीये. रशियाकडून कच्चे तेल कोणीही खरेदी करू नये, याकरिता इतर देशांवर डोनाल्ड ट्रम्प हे दबाव टाकत आहेत. फक्त दबावच नाही तर टॅरिफ हा त्याचाच एक मोठा भाग आहे. आता रशिया हा युक्रेन विरोधातील युद्धात आक्रमकता दाखवत आहे. युक्रेनने थेट रशियाच्या परमाणू ठिकाणांना टार्गेट केले, त्यानंतर रशिया हा युक्रेनवर हल्ला चढवताना दिसतोय. नुकताच झालेल्या हवाई हल्ल्याने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेंस्की यांची झोप उडालीये.
वोलोदिमिर जेलेंस्की यांनी रशियाने केलेला हवाई हल्ला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा केलेला हल्ला असल्याचा दावा केलाय. जेलेंस्की यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, रशिया हा युक्रेनवर आणखी हल्ला करून नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मला असे वाटते की, पुतिन हे संपूर्ण जगाची परीक्षा घेत आहेत. सर्व देशांनी पुढे येऊन रशियाविरोधात कडक कारवाई केली पाहिजे.
रशिया आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर निर्बंध आणि कडक शुल्क (टॅरिफ) लादले पाहिजे. रशियासोबतच्या सर्व प्रकारच्या व्यापारावरही बंदी घातली पाहिजे. कारण नुकसान भरून काढले पाहिजे. जेलेंस्की पुढे म्हणाले, पुतिन यांना कोणतीही वाटाघाटी नको आहे, ते स्पष्टपणे लपून बसले आहेत, म्हणून रशियाची इंधन टंचाई आणि इतर आर्थिक समस्या ही युद्धबंदी किंवा बैठक घेत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनचे युद्ध संपवण्यासाठी स्वत:चा स्वार्थ बघितले आणि तिथेच मोठी चूक झाली आणि हे युद्ध भडकताना दिसत आहे.
दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेन आणि रशिया यांच्यात मध्यस्थी करत होते. मात्र, या मध्यस्थी मागे त्यांचे मोठे राजकारण होते. त्यांना ही युद्ध बंदी झाल्यानंतर थेट युक्रेनकडून शस्त्र घ्यायची होती. मात्र, यामध्ये अडचणी येत असल्याचे दिसल्याने त्यांनी माघार घेतली. युक्रेनला रशियासोबतच्या युद्धाला अगोदर त्यांनीच प्रोत्साहन दिले आणि आता जगासमोर युद्धामध्ये मध्यस्थीची भूमिका आपली असल्याचे दाखवताना ते दिसत आहेत.