Big Fish In Desert : या पृथ्वीतलावर अनेक आश्चर्यकारक ठिकाणं आहेत. काही ठिकाणं तर अशी आहेत जिथे आतापर्यंत माणूस पोहोचू शकलेला नाही. काही वस्तू तर अशा आहेत, ज्यांना पाहून आपण अचंबित होऊन जातो. काही ठिकाणी आकाश जमिनीवर टाकेलेले दिसते. तर काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह आकाशात जाताना दिसतो. पृथ्वीवर काही ठिकाणी सप्तरंगी पाणी पाहायला मिळते तर काही ठिकाणी अचंबित करणारे प्राणी. सध्या मात्र एक अजब प्रकार समोर आला आहे. एका विस्तीर्ण समुद्रात तब्बल 200 मीटर मासा असल्याचे बोलले जात आहे. त्याचे फोटोही समोर आले आहे. समुद्रात चक्क मासा कसा असू शकतो? असाच प्रश्न आता अनेकांना पडू लागला आहे.
वाळवंटात मासा कसा काय आढळला?मिळालेल्या माहितीनुसार सौदी अरेबियातील अल-उला नावाच्या वाळवंटात तब्बल 200 मीटर लांबी असलेला मासा सापडला आहे. खरं म्हणजे हा मासा म्हणजे खराखुरा समुद्रात आढळणारा मासा नाही. इथे एक माशाचा आकाराचा महाकाय डोंगर आहे. दुरुन पाहिल्यावर हा डोंगर अगदी माशाप्रमाणे भासतो. त्यामुळेच डोंगराला वाळवंटातील मासा असे म्हणतात. या डोंगराकडे पाहिल्यावर एखादा विशाल मासा वाळवंटात पोहोत आहे, असाच भास होतो.
तब्बल 200 मीटर लांब मासामाशासारखा आकार दिसत असल्याने या डोंगराला फिश रॉक म्हटले जाते. विशेष म्हणजे हा डोंगर काही मानवांनी तयार केलेला नाही. वाळवंटातील हा डोंगर नैसर्गिक आहे. म्हणूनच लोक आश्चर्य व्यक्त करतात. हा डोंगर तब्बल 200 मीटर लांब आहे. म्हणजेच दोन फुटबॉलच्या मैदानाएढा हा डोंगर असून वाळवंटात हा डोंगर महाकाय माशासारखा वाटतो.
वाळवंटात माशासारखा डोंगर कसा तयार झाला?वाळवंटात माशाचा आकाराचा डोंगर पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विस्तीर्ण अशा वाळवंटात हुबेहुब माशासारखा भासणारा हा डोंगर कसा तयार झाला? असा प्रश्न विचारला जातो. यावर पुरातत्वशास्त्रज्ञांनी काही दावे केलेले आहेत. नदीच्या प्रवाहामुळे डोंगराला माशाचा आकार आला असावा, असा अंदाज पुरातत्वशास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आहे. सुमारे 500 दशलक्ष वर्षांपूर्वी एका मोठ्या डोंगरावर प्राचीन नदीचे पाणी आदळत असावे. पाण्याच्या याच प्रवाहामुळे विशाल डोंगरातील हा छोटासा भाग सुपरकॉन्टिनेंट गोंडवानाच्या किनाऱ्यापर्यंत आला असेल. त्यातून हा विशाल माशासारखा वाटणारा डोंगर तयार झाला असेल, असाही तर्क पुरातत्वशास्त्रज्ञांनी लावलेला आहे.
दरम्यान, या ठिकाणाला भेट देण्यासाठी लोक गर्दी करतात. या अजब माशाचे फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत.