Pune: विसर्जन मिरवणुकीत भयंकर घडलं; महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप
Saam TV September 08, 2025 08:45 PM
  • पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग झाला.

  • ढोल ताशा पथकातील दोन सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • महिला पत्रकार व तिच्या सहकाऱ्याला शिवीगाळ व मारहाणही करण्यात आली.

  • घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त केला गेला आहे.

पुण्यात तब्बल ३३ तासांहून अधिक काळ विसर्जन मिरवणूक पार पडली. हजारो भाविक यात सहभागी झाले. घरगुती तसेच मोठ्या मंडळातील गणपतींचे विसर्जन झाले. मात्र, या भक्तिरसात एक धक्कादायक प्रकार घडला. भरमिरवणुकीत ढोल ताशा पथकातील सदस्यांनी महिला पत्रकाराचा विनयभंग केला. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच २ ढोल ताशा सदस्यांवर गुन्हा दाखल केला.

मिळालेल्यामाहितीनुसार, शनिवारी राज्यात विसर्जन मिरवणूक पार पडली. पु्ण्यातही भक्तीभावाने मिरवणूक पार पडली. यावेळी पत्रकारही उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करण्यासाठी महिला पत्रकार (वय वर्ष २०) त्यांच्या सहकाऱ्यासोबत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात गेल्या होत्या.

आईचा मृतदेह पुराच्या पाण्यात तरंगत राहिला, ५ वर्षाच्या मुलानं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण..., ह्रदय पिळवटून टाकणारा VIDEO

यावेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील सदस्यांनी त्यांच्या मार्गात अडथळा आणला. ढोल ताशा पथकातील एका सदस्याने ढोल ताशा ट्रॉलीचे चाक महिलेच्या पायावर घातले. महिला पत्रकाराने त्या व्यक्तीला जाब विचारला. त्यावेळी पथकातील एका सदस्याने त्यांना स्पर्श करून ढकलून दिलं.

ट्रेन की OYO? तरूणीच्या अंगावर तरूण बिलगून झोपला अन्...; सीटवर कपलचं नको ते कृत्य, व्हिडिओ व्हायरल

महिला पत्रकाराच्या सहकाऱ्याने याबाबत जाब विचारले असता, त्याला सुद्धा पथकातील सदस्याने शिवीगाळ करत मारहाण केली. असे महिलेच्या तक्रारीत नमूद आहे. यानंतर महिला पत्रकाराने पोलिसांकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पथकातील २ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विसर्जनाला उशीर! लालबागचा राजा ६ तासांपासून चौपाटीवरच, नेमकं कारण काय? VIDEO

सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार आणि शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.