रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच व्यासपीठावर आले. अलिबाग इथं सरकारी कार्यक्रमाला या दोघांनी हजेरी लावली. दोघेही शेजारी बसून गप्पा दंग झाले होते. रायगडचे सध्या पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे आहे.
अंतरवालीत पोहचलेले जरांगे पाटील भावूक : हसले, रडले अन् गुलालही उधळलाहैदराबाग गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय लागू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी इथे पोहचले. गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. जेसीबीने गुलाल उधळला. हे स्वागत पाहुन जरांगे पाटील प्रचंड भावूक झाले होते.
सरकार ओबीसींच्या मुळावर उठलं : विजय वडेट्टीवारसरकारकडून मराठा व ओबीसी दोन्ही समाजाला खेळवण्याचा प्रकार सुरु आहे.कारण पात्र शब्द काढल्यानंतर तो जीआर सरसकट झाला आहे. सरकार ओबीसींच्या मुळावर उठलं आहे असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरआधी प्रमाणपत्र प्रक्रिया सुरु करा, अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेलहैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करा. १७ सप्टेंबरच्या आत ही प्रोसेस सुरु झाली पाहीजे. अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. अमंलबजावणी न झाल्यास दसऱ्या मेळाव्यात आम्हाला भूमिका जाहीर करावी लागेल असं जरांगे पाटील म्हणाले.
नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढनाशिकमध्ये गंगापूर धरणातून ३ हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
17 सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्र द्या - मनोज जरांगे पाटील17 सप्टेंबरच्या आत मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरुवात झाली पाहिजे. हैदराबाद गॅझेट मधील नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. प्रमाणपत्र वाटप करण्यात सुरुवात झाली पाहिजे. अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सरकारची ओबीसीविरोधी भूमिका हाणून पाडू - विजय वडेट्टीवारओबीसी समाजाचे नुकसान होणारे काम सध्याच्या महायुती सरकारकडून होत असेल तर आता लढावे लागेल आणि आपल्या हक्काचे रक्षण करावे लागेल. या सरकारची ओबीसी विरोधी भूमिका हाणून पाडावी लागेल, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
लक्ष्मण हाके संघर्ष यात्रा काढणारलक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये मोर्चा काढून सरकारच्या जीआरला विरोध केला होता. त्यांनी बीडमधील गेवराई येथे सभा घेत ज्या आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला त्यांच्यावर टीका केली. हाके यांनी ओबीसींच्या जागृतीसाठी तसेच ओबीसीमध्ये मराठा समाजाची होत असलेल्या घुसखोरी विरोधात संघर्ष यात्रा राज्यभर काढणार असल्याचे जाहीर केले आहे.
आयुष कोमकर हत्येप्रकरणी दोघांना अटकआयुष कोमकर खूनप्रकरणी पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांनीआरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील - देवेंद्र फडणवीसरामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हैद्रबाद गॅझेट अंमलबजावणीनंतर ओबीसी संघटना एकवटल्या, आज मुंबईत बैठकमनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर हैद्राबाद गॅझेट लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी संघटनांनी मराठ्यांच्या ओबीसीत समावेश होत असल्याचा आक्षेप घेतला आहे. ओबीसी नेत्यांनी आज मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. तर, मंगळवारी 9 सप्टेंबरला इतर मागास व बहुजन कल्याण मंत्र्यांनीही ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी बैठक बोलावली आहे. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे.