जुनी सांगवी, ता.८ ः दापोडी येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टच्यावतीने आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेत शीतल सुतार यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धेचे उद्घाटन अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टच्या दीपाली कणसे, शोभा पगारे, नूतन सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी परिसरासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ९५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या सजावट स्पर्धेत सविता सातव यांनी द्वितीय क्रमांक, शोभा शिंदे यांनी तृतीय, आशा गुप्ता यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. तर सारिका सुतार, अश्विनी सुतार यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. कविता कणसे यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री सुतार यांनी आभार मानले.
PIM25B20340