1 तेजश्री प्रधानने नवा 3D फोटो ट्रेंड इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला.
2 तिच्या पर्सनल फोटोंसह मालिकेतील स्वानंदी-समरचे फोटोही 3Dमध्ये कन्वर्ट केले गेले.
3 सोशल मीडियावर तिचे फोटो जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांची पसंती मिळतेय
Tejashree Pradhan: सोशल मीडियावर सध्या एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. या ट्रेंडमध्ये फोटोंवरून बनवले जाणारे 3D डिजिटल फोटो इंटरनेटवर व्हायरल झालेत. अनेकांना या ट्रेडचं वेड लागलं आहे. सध्या सोशल मीडियावर या ट्रेडची जोरदार चर्चा होताना पहायला मिळते. गुगलच्या नव्या एआय फीचरच्या मदतीने तयार करण्यात येणारे हे मिनिएचर फिगरिन्स अगदी खरेखुरे दिसत असल्याने नेटकऱ्यांचं लक्ष या नव्या ट्रेंडकडे वेधलं गेलं आहे.
या एआय टूलच्या साहाय्याने राजकारणी नेते असोत किंवा बॉलिवूड सेलिब्रिटी, प्रत्येकजण आपले 3D मॉडेल तयार करून शेअर करताना दिसत आहे. यात अभिनेत्री तेजश्री प्रधान सुद्धा पुढे आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसताय.
Tejashri Pradhan Joins 3D Photo Trend | Actress Shares Viral Instagram Pics:
व्हायरल फोटोमध्ये तेजश्रीचे अनेक पर्सनल फोटो 3Dमध्ये कन्वर्ट केलेत. तसंच तिने तिची नवी मालिका वीण दोघातली ही तुटेना यामधील स्वानंदी आणि समरच्या फोटोसुद्धा 3D फोटोमध्ये कन्वर्ट केलय. तिच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती येताना पहायला मिळत आहे. अनेकांनी फोटोवर कमेंट्स करत 'लय भारी' असंही म्हटलय.
तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. तेजश्री प्रधान फॅन्स पेजकडून तिच्या फोटोचं 3D कन्वर्ट करण्यात आलं होतं. सध्या तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स येताना पहायला मिळताय.
FAQs
तेजश्री प्रधान कोणत्या नव्या ट्रेंडमध्ये सहभागी झाली आहे?
ती 3D डिजिटल फोटो ट्रेंडमध्ये सहभागी झाली आहे.
तेजश्री प्रधानने तिचे कोणते फोटो 3D केले आहेत?
तिने पर्सनल फोटो तसेच वीण दोघातली ही तुटेना मालिकेतील फोटो 3Dमध्ये कन्वर्ट केले आहेत.
हे 3D फोटो कशाच्या मदतीने तयार केले जातात?
गुगलच्या नव्या एआय फीचरच्या साहाय्याने हे फोटो तयार केले जातात.
तिच्या 3D फोटोना चाहत्यांची प्रतिक्रिया कशी मिळाली?
नेटकऱ्यांनी फोटोवर कमेंट्स करत “लय भारी” अशी स्तुती केली आहे.
"दुसऱ्याचं घर फोडलं...!" स्मिता पाटीलच्या आईचा राज बब्बरसोबतच्या लग्नाला होता तीव्र विरोध! म्हणाल्या... 'तु तर होमब्रेकर...'