लोणावळा, ता. १० : सामाजिक सलोख्याच्या संदेशासह लोणावळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत महंमद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
लोणावळा शहरामध्ये जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. यंदाचे हे १५०० वे जयंती वर्ष असल्यामुळे यावर्षी अधिक उत्साहाने व धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करत मुस्लिम समाज्याच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुस्लिम बांधवांच्या वतीने उत्साहात मिरवणूक (जुलूस) काढण्यात आला. यावेळी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोणावळा सोशल फाउंडेशनच्या वतीने जुलूसचे स्वागत करण्यात आले. लहान मुलांना भेटवस्तू वाटप करण्यात आले. लोणावळा सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्ते सय्यद झाहिद हबीब, आलीम फजल शैख, अनीस इकबाल तांबोळी, लतीफ खान, मन्सूर मणियार, सूरज मुजावर, परवेझ शेख, वासीम करीम शेख, नवाज अयाज बागवान, मोहसीन अत्तर, इर्शाद तांबोळी यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
छायाचित्र: LON25B04705/04706