-rat९p३०.jpg-
२५N९०४१९
लांजा ः प्रभानवल्ली येथील क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना गौरवताना राजापूर नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड.
-----
क्रिकेट स्पर्धेत ‘ओंकार इलेव्हन’ विजयी
लांजा, ता. १० ः तालुक्यातील प्रभानवल्ली-खोरनिनको येथील आदर्श विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत हरळ येथील ओंकार इलेव्हनने विजेतेपद पटकावले. प्रभानवल्लीच्या जयभवानी इलेव्हन संघाला उपविजेतेपद मिळाले.
स्पर्धेमध्ये एकूण २२ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापिका अनिता शिंदे व संस्थेचे अध्यक्ष विठोबा चव्हाण यांनी केले. या वेळी श्री देवी आदिष्टी शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस गणेश चव्हाण, कार्याध्यक्ष जितेंद्र ब्रीद, संचालक मंगेश जाधव, विनायक बिजम आदी उपस्थित होते. स्पर्धेत मालिकावीर म्हणून ओंकार थरली, उत्कृष्ट फलंदाज प्रकाश शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज गुरू व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रसाद शिंदे यांना गौरवण्यात आले.
---