नेपाळमध्ये सध्या मोठं आंदोलन सुरू आहे, Gen Z आंदोलकांनी अख्ख नेपाळ आपल्या ताब्यात घेतलं आहे. संसद भवनाला देखील आंदोलकांकडून आग लावण्यात आली आहे. संपूर्ण नेपाळ आंदोलकांच्या संतापाच्या लाटेत होरपळून निघत आहे. आंदोलक केवळ नेपाळच्या संसद भवनाला आग लावून थांबले नाहीत तर त्यांनी नेपाळमधील अनेक प्रमुख नेत्यांच्या घरावर देखील हल्ला केला आहे. सध्या नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, गृहमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी राजीनामा दिला आहे. नेपाळमध्ये अराजक निर्माण झालं आहे. सोशल मीडियाच्या काही साईटवर अचानक बंदी आणल्यानं Gen Z आंदोलकांनी हा उठाव केल्याचं बोललं जात आहे, मात्र त्यामागे इतरही अनेक कारणं आहेत.
संपूर्ण नेपाळ पेटलं असताना एक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नेपाळमध्ये या सर्व घडामोडी सुरू असतानाच तिथे कॅमेरा घेऊन एक परदेशी नागरिक देखील उपस्थित होता. हैरी असं या व्यक्तीचं नाव आहे, हॅरी हा ब्रिटिश नागरिक असून, तो व्यावसायानं एक युट्यूबर आहे. we Hate The Cold’ नावाचं त्याचं युट्यूब चॅनल आहे. नेपाळमध्ये घडलेल्या या आंदोलनानं हैरीला एका रात्रीतून इंटरनेटचा हिरो बनवलं आहे.
नेपाळच्या राजकारणात भूकंप आला आहे, आंदोलकांनी नेपाळमधील सरकारचा पाडव केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी नेपाळच्या संसद भवनाला देखील आग लावली आहे. मात्र हे आंदोलन सुरू असताना व्यावसायानं युट्यूबर असलेला हॅरी हा देखील नेपाळमध्येच होता. त्याने हे सर्व आंदोलन त्याच्या चॅनलवर कव्हर केलं, ते हे आंदोलन सुरू असताना अशा प्रत्येक ठिकाणी उपस्थिती होता, जिथे पत्रकार देखील पोहोचू शकले नाहीत. त्याचा त्याला एवढा फयदा झाला की त्याच्या चॅनलचे 35 हजार सब्सक्राईबर आहेत, त्याचे व्हिडीओ दिवसातून सात ते आठ हजार लोक पाहातात. मात्र त्याचे नेपाळमधील व्हिडीओ एकाच दिवशी तब्बल आठ लाख लोकांनी पाहिले आहेत. नेपाळमधील या आंदोलनानं हॅरिला एका रात्रीतून सोशल मीडियाचा हिरो बनवलं आहे.