Yashasvi Jaiswal : आशिया कपमधून डच्चू, त्यानंतर यशस्वीला आणखी एक झटका, आयसीसीने नक्की काय केलं?
GH News September 11, 2025 01:13 AM

टीम इंडियाचा युवा ओपनर यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केली. यशस्वीने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक करत कडक सुरुवात केली. तर पाचव्या आणि अंतिम सामन्यात पुन्हा शतक करत इंग्लंड दौऱ्याची सांगता केली. यशस्वीने फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी केली. त्यामुळे यशस्वीला आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र निवड समितीने यशस्वीला झटका दिला. यशस्वीचा आशिया कप स्पर्धेसाठी मुख्य संघात समावेश करण्यात आला नाही. यशस्वीला राखीव म्हणून संधी देण्यात आली. त्यामुळे यशस्वीच्या पदरी निराशा पडली. त्यानंतर आता यशस्वीला आणखी एक झटका लागला आहे.

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून आज बुधवारी 10 सप्टेंबरला टी 20i रँकिंग जाहीर केली आहे. यशस्वीला या बॅटिंग रँकिंगमध्ये झटका लागला आहे. यशस्वी टॉप 10 फलंदाजांच्या यादीतून बाहेर फेकला गेला आहे. सध्या टी 20i आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. त्यामुळे यशस्वीला येत्या काही आठवड्यात आणखी नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यशस्वी बॅटिंग रँकिंगमध्ये कितव्या स्थानी?

श्रीलंका टीम काही दिवसांपूर्वी झिंबाब्वे दौऱ्यावर होती. श्रीलंकेने झिंबाब्वेला वनडे सीरिजमध्ये 2-0 ने क्लिन स्वीप केलं. तर 3 सामन्यांची टी 20i मालिका 2-1 ने जिंकली. या मालिकेत श्रीलंकेच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. कुसल परेरा याने या मालिकेत बॅटिंगने धमाका केला. कुसलला त्याचाच फायदा टी 20 रँकिंगमध्ये झाला आहे. त्यामुळे यशस्वीची घसरण झाली आहे.

कुसलने रँकिंगमध्ये 3 स्थानांनी झेप घेतली आहे. तर यशस्वीची 11 व्या स्थानी घसरण झाली आहे. यशस्वीच्या खात्यात 673 रेटिंग पॉइंट्स आहेत.

अभिषेक शर्मा पहिल्या स्थानी कायम

दरम्यान भारताचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आपलं पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. अभिषेक 829 रेटिंगसह नंबर 1 आहे. तर तिलक वर्मा 804 रेटिंगसह दुस्या क्रमांकावर आहे. तर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या खात्यात 739 रेटिंग पॉइंट्स आहेत. सूर्या सहाव्या स्थानी कायम आहे. तर इंग्लंडच्या फिल सॉल्ट आणि जोस बटलर ही जोडी टॉप 5 मधील आपलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे.

अर्शदीप सिंह रँकिंगमध्ये कितव्या स्थानी?

तसेच बॉलिंग रँकिंगमध्ये पहिल्या 10 मध्ये टीम इंडियाच्या तिघांचा समावेश आहे. भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या अर्शदीप सिंह याला बॉलिंग रँकिंगमध्ये एका स्थानाचा फायदा झाला आहे. अर्शदीपने दहाव्या स्थानावरुन नवव्या स्थानी झेप घेतली आहे. रवी बिश्नोई सातव्या क्रमांकावरुन सहाव्या स्थानी पोहचला आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.