पुणे: घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका बंगल्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. बंगल्यात अडकलेल्या आठ जणांची सुखरूप सुटका करण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना खिडक्यांचे गज तोडावे लागले. अखेर जवानांनी प्रयत्न करून सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
Pune Live: ट्रॅक्टरच्या धडकेत मुलगा जखमीविसर्जन सोहळ्यात गर्दीत ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडल्याने १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शिवाजीनगर परिसरातील श्री ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात रविवारी (ता. ७) दुपारी घडली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक जखमी मुलाला रुग्णालयात न नेता पसार झाला. दीपक गोरक्ष नेटके (वय १४) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार संदीप शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालक अमोल भीमराव मोहिते (वय ४१, रा. गोकळी, ता. फलटण) याच्यासह दोघांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेतबोरावळे (ता.राजगड) येथील रानडुकराच्या शिकार प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना मंगळवार (ता.०९) रोजी रात्री उशिरा घडली असल्याची माहिती राजगड वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी दिली.
याप्रकरणी गुलाब बबन शिंदे (वय.40) संतोष बबन तळेकर (वय.45) शंकर बबन गोरे (वय.45) तिघेही राहणार बोरावळे (ता.राजगड), व बबलू शंकर बांदल (वय.40) व शांताराम कृष्णा खुटवड (वय.59) राहणार निगडे बुद्रुक (ता.राजगड) व भोर तालुक्यातील पारवडी येथील सहदेव विलास लिम्हण (वय.37), व राजाराम सदाशिव शिर्के (वय.52) अशा एकूण सात जणांना वनविभागाच्या कडून अटक करण्यात आली आहे.
Beed Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखलबीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील जंबुरा वस्ती येथील नवविवाहित सोनाली वनवे हिचं लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच दुर्दैवी निधन झालं. विवाहानंतर फक्त पंधरा दिवसांतच तिच्याकडे पाच लाख रुपयांसाठी तगादा लावून तिला छळण्यात येत होता. काही दिवसांनी तिचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आला, आणि त्यावर अनेक जखमा होत्या. तलवाडा पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Pune Live: पुण्यात शिवसैनिक बैठकीत कार्यकर्ते नाराजपुण्यात शिवसैनिक बैठकीत कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा
उदय सामंत यांना भेटण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराज
कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख नाराज
उदय सामान त्यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिका पार्श्वभूमीवर बैठक पार पडली
बैठकीनंतर उदय सामंत यांना भेटण्यावरून झाला वाद
यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनाट्य
Nashik Live: देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इलेक्ट्रिक चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्ननाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. याशिवाय, फडणवीस आणि भुजबळ यांनी मुंबई ते नाशिक प्रवास एकत्र केल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Live: अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका: “महापालिकेच्या भीतीने एकत्र आले तरी पराभव ठरलेलाच”मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगली असताना, मुंबई भाजपाध्यक्ष आमदार अमित साटम यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. साटम यांनी सांगितले की, मागील अकरा वर्षांत राज्य सरकारच्या माध्यमातून मेट्रो, कोस्टल रोडसह अनेक विकास प्रकल्प राबवले गेले असून याच बळावर महायुतीचा महापौर मुंबईत निश्चित होणार आहे. ठाकरे बंधू विकास कामांच्या धास्तीमुळेच एकत्र येत आहेत, अशी टीका त्यांनी केली. शिवाय, बेस्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत एकत्र आल्यावरही पराभव पत्करावा लागला, तो फक्त ट्रेलर होता; खरी लढत मुंबई महापालिकेत होईल आणि त्यातही पराभव अटळ आहे, असे साटम म्हणाले.
Nashik Live: ओबीसी उपसमितीची बैठक पार पडल्यावर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांचा एकाच विमानातून प्रवासनाशिकमध्ये ओबीसी उपसमितीची बैठक पार पडल्यावर देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ हे एकाच विमानातून प्रवास करताना दिसले. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये होणाऱ्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमाला देखील हे दोन्ही नेते एकत्र उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या एकत्र प्रवासाची आणि उपस्थितीची चर्चा रंगली आहे.
Bjp Live: भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा जामीन अर्ज फेटाळला; पोलिस तपासावरही हायकोर्टाची ताशेरेनाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार देत पोलिसांच्या तपासावरही तीव्र ताशेरे ओढले आहेत. राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी निमसेविरोधात गंभीर गुन्हा दाखल असून, त्याच्या शोधासाठी नाशिक पोलिसांनी चार विशेष पथके तैनात केली आहेत. मात्र, तपासाच्या गतीवर आणि पद्धतीवरच न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निर्णयामुळे प्रकरण अधिक गंभीर वळण घेणार असल्याचे मानले जात आहे.
Mumbai News Live: ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावरदरवर्षीप्रमाणे ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडणार असून त्यासाठी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित असणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
Mumbai Fire: गोरेगाव येथील इमारतीला आग; सुदैवाने जीवितहानी नाहीगोरेगाव (पश्चिम) येथील एका निवासी इमारतीत बुधवारी दुपारी भीषण आग लागली. महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, ही आग शालीमार बिल्डिंग, सिद्धी गणेश सोसायटी, एसव्ही रोड, रोड नंबर ०४, गोरेगाव (पश्चिम) येथील जी+५ निवासी इमारतीच्या कॉमन मीटर बॉक्समध्ये लागली.मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) दुपारी १२:१८ वाजता ही घटना नोंदवली. दुपारी १२:२५ वाजता लेव्हल १ ला आग लागल्याची घोषणा करण्यात आली आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीच्या कारणाबाबत अधिकारी तपास करत आहेत.
Jalgaon Live: शेतात काम करताना दुर्दैवी घटना, इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून जागीच मृत्यूजळगाव येथील मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करत असताना एकनाथ जगन्नाथ कांदले (वय ४१) यांचा जमिनीवर पडलेल्या बेवारस इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Pune Live : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी सुनावणी पारस्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण...
या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी पढील सुनावणी 22 सप्टेंबरला पार पडणार
राहुल गांधीनी लंडनमध्ये जे भाषाण केलेय...
त्याचा तपास विश्रामबाग पोलिसांनी केला...
पोलिसांनी मायक्रोसॉप्टकडे टेकनिकल माहिती मागवली होती....
ती पोलिसांनी कोर्टासमोर सादर करावी अशी सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी मागणी केली..
याला राहुल गांधींच्या वकिलांनी या मागणीवर हरकत घेतली असून,
यावर आता पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे...
पुणे पोलिसांना जी माहिती मायक्रोसॉफ्ट ने दिले आहे ती कोर्टात पोलीस सादर करणार का याकडे लक्ष
Mumbai Live : मनसेची उद्या सकाळी 10 वाजता बैठकमनसेची उद्या सकाळी 10 वाजता बैठक
दसरा मेळाव्याबाबत दोन्ही ठाकरे बंधूमध्ये चर्चा झाल्याची माहिती.
Mumbai Live : शिवतीर्थावर राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये खलबतंशिवतीर्थावर राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये खलबतं
अडीच तास राज-उद्धव यांच्यात चर्चा
आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूची खलबतं
Hingoli Live : ओबीसी आंदोलकांनी औंढा नागनाथ मध्ये मार्ग रोखलाहिंगोलीच्या औंढा शहरात ओबीसी आंदोलकांनी राज्यमार्ग रोखून धरत आंदोलन केले आहे, हजारोच्या संख्येने ओबीसी बांधवांनी सरकारच्या विरोधात हे रास्ता रोको आंदोलन केले आहे दरम्यान ओबीसी आंदोलनामुळे औंढा शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे थांबली होती तर चार ते पाच किलोमीटर वाहनाच्या रांगा देखील लागल्या होत्या, ओबीसी मतांच्या भरोशावर निवडून आलेले महायुती सरकार ओबीसी बांधवांचा घात करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी आंदोलकांनी केला होता.
Sangali Live : "तर जन सुरक्षा कायद्याच्या आडून सरकार शेतकऱ्यांना नक्षलवादी ठरवेल" - रोहित आर आर पाटील"पंजाबच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दहशतवादी ठरवले. तसेच जर उद्या राज्यातील शेतकरी ऊस दरासाठी आंदोलन करतील तर त्यांना ही या जन सुरक्षा कायद्याच्या आडून सरकार नक्षलवादी ठरवेल" अशी टीका सांगलीमध्ये खासदार रोहित आर आर पाटील यांनी केली. महाविकास आघाडीतर्फे जनसुरक्षा कायद्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
Chandwad Live : राहूड घाटात एलपीजी टँकर पलटी; चालकाचा मृत्यू, परिसरात भीतीचे सावटमुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहूड घाटात भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टँकरचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, गॅसगळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर चांदवड-उमराणे महामार्ग तब्बल २० तासांहून अधिक काळ बंद ठेवावा लागला.मालेगावच्या दिशेने जात असताना आधीच अपघातग्रस्त पोकलेन आणि ट्रक रस्त्यावर उभे होते. नियंत्रण सुटल्याने एलपीजी टँकर प्रथम ट्रकवर आदळला. त्यानंतर दुभाजक ओलांडून समोरील पोकलेनवर जाऊन धडकला. या धडकेची तीव्रता इतकी होती की टँकर पलटी होऊन गॅसची गळती सुरू झाली.
Mumbai Live : महापालिका निवडणुकांसंदर्भात उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये चर्चाउद्धव ठाकरे हे राज यांच्या भेटीला शिवतीर्थावर गेले असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती समजते आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अनिल परब आणि संजय राऊतही उपस्थित आहेत.
Mumbai Live : मुंबई लोकलमध्ये जोरदार हाणामारीमुंबईमधील ठाणे वाशी ट्रान्स हार्बर लोकलमध्ये सीटवरून दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सहप्रवाशांनी हस्तक्षेप करून हा वाद थांबवला.
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची आर्थिक मदत पूर्णमराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आंदोलनात एकूण २५४ जणांचा मृत्यू झाला होता.
यापैकी आधीच १५८ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्यात आली होती. तर आता उर्वरित ९६ मृतांच्या नातेवाईकांना मिळून एकूण ९ कोटी ६० लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
यामुळे आंदोलनात मृत्यू झालेल्या सर्व २५४ जणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ठरलेली आर्थिक मदत पूर्णत्वास पोहोचली आहे.
Uddhav Thackeray Live : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीलाउद्धव ठाकरे,संजय राऊत , अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला
15 मिनिटपासून बैठक सुरू
Thane Live : ठाणे महापालिका प्रभाग रचना सुनावणीपूर्वी राजकीय हालचालींना वेगमहाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी महापालिका कार्यालयात दाखल झाले. जितेंद्र आव्हाड, केदार दिघे आणि विक्रांत चव्हाण यांची संयुक्त उपस्थिती होती. चर्चेत मनसे नेते अविनाश जाधव यांचाही सहभाग दिसून आला.
सुनावणीपूर्वी महापालिकेचे उपयुक्त दिनेश तायडे यांच्या दालनात बैठक सुरू असून, या बैठकीत प्रभाग रचना सुनावणीत निवडणूक आयोग व आयुक्तांना कशाप्रकारे घेरायचे आणि आपली हरकत प्रभावीपणे मांडायची यावर सविस्तर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Politics LiveUpdate: मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकत्रित पत्रकार परिषद१२ सप्टेंबरला नाशकात काढणार एकत्रित मोर्चा. मोर्चासह उपस्थित राहणाऱ्या नेत्यांबाबत पत्रकार परिषदेत देणार माहिती. दोन्ही पक्षाच्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची मनसे कार्यालयात पत्रकार परिषद.
Santosh Deshmukh Case LiveUpdate: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरलाआरोपी विष्णू चाटे सह सुदर्शन घुले च्या दोष मुक्तीच्या अर्जावर 24 सप्टेंबरला न्यायालय निर्णय देणार तपाशी अधिकाऱ्यांनी कुठलीही कोर्टाची परवानगी न घेता न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले. कपाशी अधिकारी कोर्टासारखे वागत आहेत आरोपींच्या वकिलाचे न्यायालयातील. तर सरकारी विशेष वकील उज्वल निकम यांनी म्हटले आहे की कुठलेही प्रकारचे चुकीचे दोषारोपपत्र किंवा न्यायालयासारखे तपासी अधिकारी वागले नाहीत. आरोपी विष्णू चाटे सुदर्शन घुले यांच्यासह इतर आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर न्यायालयात सरकारी वकील उज्वल निकम यांनी कडाडून विरोध केला.
Pune LiveUpdate: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनआंदोलनसहकारनगरात महिला जादूटोण्याचा बळी मंत्रोच्चार,अंगारा आणि अघोरी विधी दाखवून एका महिलेला तब्बल ३ लाख १५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका ३६ वर्षीय व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. गिरीश बलभीम सुरवसे वय 36 असं फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव आहे. आरोपीने पीडित महिलेला विश्वासात घेत मंदिरात नेले.त्याठिकाणी मंत्रोच्चार करत अघोरी विधी केल्याचे भासवले.त्यानंतर अंगाऱ्याचा पेढा खाण्यास देऊन तिच्या भीतीचा गैरफायदा घेत सोन्याचे दागिने आणि रोख मिळून ३ लाख १५ हजार रुपये घेतले. हा प्रकार २८ जुलैपासून ९ सप्टेंबर दरम्यान घडल्याचे उघड झाले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.
Beed Live : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला विशेष मकोका न्यायालयात सुरुवातविशेष सरकारी वकील उज्वल निकम व सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे न्यायालयात हजर. सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 14 वी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात. विष्णू चाटे सुदर्शन घुले सह इतर आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आज होणार न्यायालयात युक्तिवाद. विषय सरकारी वकील उज्वल निकम बीडमध्ये दाखल. आरोपी वाल्मीक कराडचा देशमुक्तीचा अर्ज आणि जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र आता विष्णू काटे सह मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या व इतर आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर बीडच्या न्यायालयामध्ये युक्तिवाद होणार आहे.
Maharashtra Live : महाराष्ट्रात 8 महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; धक्कादायक आकडेवारी समोरराज्यातील शेतकरी आत्महत्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.. जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांमध्ये तब्बल 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, सर्वाधिक 44 शेतकरी आत्महत्या एका महिन्यात ऑगस्टमध्ये यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहे. या 1183 शेतकरी आत्महत्या मध्ये 607 शेतकरी आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्या आणि 306 शेतकरी आत्महत्या अपात्र करण्यात आल्या.
Mumbai Live : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त घोषणा
कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
आयटीआयमध्ये अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम घेणार
१ ऑक्टोबरला राज्यातील ४१९ आयटीआयमध्ये अभ्यासक्रमांचा शुभारंभ करणार
१७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत उपक्रम
Delhi Live : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांनी एकजूट दाखवली - संजय राऊतराज्यातून मतं फुटली म्हणण्याऱ्यांना मेंदू नाही. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांनी एकजूट दाखवली.आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही, असं संजय राऊत म्हणाले.
Pune Live : वडगाव मावळमध्ये गोळीबारात एक व्यक्ती जखमीपुण्यातील मावळ तालुक्यातील वडगाव मावळमध्ये पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार करण्यात आला आहे. यात तो जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
Shirdi Live : माजी खासदार सुजय विखेंचे बॅनर फाडल्याप्रकरणी फिर्यादी निघाला आरोपीसुजय विखे यांचे बॅनर फाडल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ज्याने फिर्यादी दिली तोच आरोपी निघाल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai Live : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्दउपमुख्यमंत्री अजित पवार आजारी असल्याने त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द कऱण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Israeli Airstrike in Qatar : इस्राईलचा कतारमध्ये हवाई हल्ला, हमासविरोधातील कारवाई सुरूचजेरूसलेम : हमासच्या म्होरक्यांना लक्ष्य करत इस्राईलने कतारमध्ये हवाई हल्ला केला. या हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला असल्याबाबत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. इस्राईलने कतारची राजधानी दोहा येथे हा हल्ला केला. हल्ल्यानंतर एका इमारतीमध्ये आग लागली होती. हमासविरोधातील आमची कारवाई सुरूच असून त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याचा आमचा इरादा ठाम आहे, असे इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'चे संचालक २५ करण्यास मंजुरी, वार्षिक सर्वसाधारण सभेत ठरावकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालकांची संख्या २१ वरून २५ करण्याचा ठराव आज वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. सभासदांमध्ये बसलेल्या विरोधी गटाच्या संचालक शौमिका महाडिक यांनी याला विरोध केला. वासाचे दूध घेणे-देणे कायद्यात बसत नाही, त्यामुळे त्याला सध्याच्या दरापेक्षा दुप्पट दर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी जाहीर केला.
Marathwada Rain : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताराज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून उन्हाचे प्रमाण वाढू लागले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत हे हवामान बदल प्रकर्षाने जाणवू शकतात. मात्र, राज्यातील उर्वरित भागात मुख्यतः पावसाची उघडपी राहण्याची शक्यता आहे.
South Western Railway : नैऋत्य रेल्वेतर्फे दसऱ्यानिमित्त विशेष रेल्वेसेवा, ३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत धावणारबेळगाव : दसरा सणाला होणारी गर्दी लक्षात घेऊन नैऋत्य रेल्वेतर्फे विशेष रेल्वेसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपासून या गाड्या धावणार असून ५ ऑक्टोबरला अखेरची विशेष रेल्वे धावेल.
Gold Rate : सोन्याच्या भावात एका दिवसात तब्बल पाच हजार रुपयांची वाढनवी दिल्ली : सोन्याच्या भावाने मंगळवारी एका दिवसात तब्बल पाच हजार रुपयांची वाढ नोंदवित प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख १२ हजार ७५० रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. नवी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव सोमवारच्या (ता. ८) १ लाख ७ हजार ६७० रुपयांवरून १ लाख १२ हजार ७५० रुपयांवर पोहोचला. चांदीनेही किलोमागे २८०० रुपयांची वाढ नोंदवित १ लाख २८ हजार ८०० रुपयांचा (सर्व करांसह) नवा विक्रम नोंदविला.
Siachen Avalanche : सियाचिन येथील हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यूलेह : जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी असलेल्या सियाचिन येथे हिमस्खलन होऊन तीन जवानांचा मृत्यू झाल्याचे आज समोर आले. रविवारी ही घटना घडल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सियाचिन येथे बारा हजार फूट उंचीवर लष्कराचा बेस कॅम्प आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी येथे हिमस्खलन होऊन बेस कॅम्पवर असलेले चार जवान बर्फाखाली गाडले गेले. इतर जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करत चौघांना बाहेर काढले. मात्र, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
Maharashtra-Karnataka Border Issue : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठककोल्हापूर : सीमाप्रश्नाला चालना देण्यासाठी उद्या (ता. १०) मुंबई येथे तज्ज्ञ समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे बैठकीकडे सीमाभागातील मराठी भाषकांचे लक्ष असणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या कामकाजाबाबत योग्य ती माहिती आणि सल्ला देण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीची बैठक मुंबईतील मंत्रालयात दुपारी तीन वाजता होणार आहे.
नेपाळमध्ये दुसऱ्या दिवशीही आंदोलनाचा भडका; अध्यक्ष-पंतप्रधानांचा राजीनामा, संसद, सरकारी कार्यालयांना आगकाठमांडू : नेपाळमध्ये सरकारविरोधात भडकलेल्या युवकांच्या आंदोलनाने आज आणखी हिंस्र स्वरूप धारण केले होते. आंदोलकांनी आज काठमांडूमधील संसदेवर हल्ला करत नासधूस केली आणि नंतर तिथे आगही लावली. आंदोलकांनी देशाचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल, माजी पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या खासगी निवासस्थानांवरही हल्ले केले.
C. P. Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती, महाविकास आघाडीची ७ ते ८ मते फुटलीLatest Marathi Live Updates 10 September 2025 : नेपाळमध्ये सरकारविरोधात भडकलेल्या युवकांच्या आंदोलनाने आणखी हिंस्र स्वरूप धारण केले. आंदोलकांनी काठमांडूमधील संसदेवर हल्ला करत नासधूस केलीये. देशाचे सतरावे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी झालेल्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल लागला असून एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल व सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार डॉ. सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले आहेत. राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली तर विरोधी पक्षांचे उमेदवार न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत १५ मते अपात्र ठरली. तसेच कोल्हापूर गॅझेटियरमध्ये १८८१ ला कुणबीच्या नोंदी दोन लाख ९९ हजार ३५० असताना सध्या केवळ सहा हजार ७५० कुणबीचे दाखले मिळाले आहेत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालकांची संख्या २१ वरून २५ करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. सोन्याच्या भावाने मंगळवारी एका दिवसात तब्बल पाच हजार रुपयांची वाढ नोंदवित प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख १२ हजार ७५० रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी असलेल्या सियाचिन येथे हिमस्खलन होऊन तीन जवानांचा मृत्यू झाल्याचे आज समोर आले. दसरा सणाला होणारी गर्दी लक्षात घेऊन नैऋत्य रेल्वेतर्फे विशेष रेल्वेसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपासून या गाड्या धावणार असून ५ ऑक्टोबरला अखेरची विशेष रेल्वे धावेल. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..