The Secret Behind Kimchi’s Worldwide Popularity: किमची म्हणजे कोरियामधील एक प्रकारचे पारंपरिक लोणचे आहे. किमची ही भाज्यांपासून बनवलेली असून, ती लोणच्याच्या स्वरूपात आंबवून तयार केली जाते. कोरियन जेवणात किमची ही एक अत्यंत महत्त्वाची साईड डिश किंवा तोंडीलावणे आहे. त्याची विविधता, चटपटीत चव आणि आरोग्यदायी गुणधर्म यामुळे ती आज जगभरात लोकप्रिय झाली आहे.
किमची बनवताना वेगवेगळ्या भाज्या या मीठ, लसूण, आले, गोचुगारू आणि इतर मसाल्यांसह आंबवल्या जातात. किमचीमधील महत्वाच्या भाज्या म्हणजे नापा कोबी आणि कोरियन मुळा. नापा कोबीला चायनीज कोबी किंवा सेलरी कोबी असेही म्हणतात. कोरियन मुळा हा पांढऱ्या रंगाचा असून त्याचा गर दाट, कुरकुरीत आणि रसदार असतो. गोचुगारू ही लाल मिरची पूड किमचीमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचे मसाला आहे. तो कोरियन लाल मिरच्या सुकवून तयार केलेला असतो आणि त्याला धुरकट व थोडीशी गोडसर अशी एक खास चव असते, काही प्रकारच्या किमचीमध्ये माशांचा सॉस किंवा कोळंबीचा पेस्ट वापली जाते.
किमची बनवण्यासाठी, भाज्या मिठात भिजवून ठेवतात, त्यामुळे व त्यात लसूण, मिरची, फिश सॉस असा मसाला व्यवस्थित शोषला जातो व त्या आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी योग्य होतात. मसाला लावलेल्या भाज्या हवाबंद बाटलीमध्ये ठेवून काही दिवस आंबवल्या जातात. या प्रक्रियेमुळे किमचीला खास चव आणि गुणधर्म प्राप्त होतात. किमची जितकी मुरेल तितकी तिची लज्जत वाढते. अशी चविष्ट किमची नूडल्स, फ्राइड राइस, सँडविचेस, पॅनकेक वा ग्रील केलेले मीट अशा पदार्थांसोबत खाल्ली जाते.
Russian Salad: मॉस्कोच्या हॉटेलमधून जगभर!शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही रूपांत लाजवाब ‘रशियन सॅलड’ची गोड कहाणी नक्की वाचाकिमचीला त्यातील भाज्या आंबवल्यामुळे हलकी आंबटसर, गोजूगारूमुळे तिखट, भाज्या मिठात मुरवल्यामुळे खारट, भाताच्या पेस्टमुळे किंचित गोडसर आणि फिश सॉस किंवा कोळंबीच्या पेस्टमुळे उमामी चव मिळते. अशी ही तिखट-आंबट, झणझणीत आणि थोडीशी खमंग चवीची किमची सुरुवातीला जड वाटते; पण एकदा आवडायला लागली, की नेहमी खावीशी वाटते. 'उमामी' हा शब्द जपानी भाषेतला असून गोड, आंबट, खारट, कडू व तुरट या चवींव्यतिरिक्त तिथे उमामी ही सहावी चव म्हणून ओळखली जाते. उमामी चव सपक पदार्थाला चटपटीत व खमंग चव देते. किमचीमध्ये उमामी चव महत्त्वाची भूमिका बजावते.
किमची हा पदार्थ शाकाहारी व मांसाहारी असा दोन्ही प्रकाराने बनवला जातो. पारंपरिक कोरियन किमची ही मांसाहारी असते कारण त्यात फिश सॉस, कोळंबीचा पेस्ट किंवा इतर सागरी पदार्थ घातलेले असतात. शाकाहारी किमची बनवताना त्यात सोया सॉस, मिसो पेस्ट, मशरूम पावडर किंवा भाताची पेस्ट वापरली जाते.
किमची हा दक्षिण कोरियाचा राष्ट्रीय पदार्थ असून, तो प्रत्येक जेवणासोबत साइड डिश म्हणून दिला जातो. किमचीचे दोनशेपेक्षा जास्त प्रकार असून त्यात प्रदेश, ऋतू आणि वापरलेले घटक यानुसार फरक असतो. किमचीचे काही लोकप्रिय प्रकार म्हणजे 'बाचू किमची' जी फक्त नापा कोबीपासून बनवलेली पारंपरिक तिखट किमची असते, तर 'डोंगचिमी' ही पांढऱ्या रंगाची मिरचीशिवाय बनवलेली सौम्य चव असलेली किमची असते. 'ककदुगी' ही कोरियन मुळ्यापासून बनवलेली चौकोनी तुकड्यांची तिखट किमची असते, तर 'नबाक' ही पाण्यातील किमची असून ती उन्हाळ्यात खाल्ली जाते.
History of Tacos: मेक्सिकोची ओळख ठरलेला 'टाको'; आता भारतीय ताटातही लोकप्रिय, जाणून घ्या त्याचा रोचक प्रवासकिमची हा फक्त चविष्ट कोरियन पदार्थ नसून त्याला प्रोबायोटिक सुपरफूड मानले जाते. त्याचे योग्य प्रमाणात व योग्य प्रकारे सेवन करणे शरीराला उपयुक्त ठरते. किमची बऱ्याच आरोग्यदायी गुणांनी परिपूर्ण असून पचन, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचेची काळजी या दृष्टीने ती फायदेशीर असते. वजन कमी करण्यासाठी किंवा निरोगी वजन राखण्यासाठी मदत करते. आज आपल्या तरूण पिढीत कोरियन जेवण व किमची खूप लोकप्रीय झाली आहे.
आपल्याकडील कोबी, गाजर, मुळा किंवा वेगवेगळ्या भाज्यांचे लोणचे आणि त्यांची चव साधारणपणे किमचीसारखीच असते त्यामुळे किमची ही संकल्पना आपल्याला नवीन वाटत नाही.