Video : हळदी दिवशी ऋषिकेशचा होणार अपघात ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "लेखकाचं डोकं ठिकाणावर आहे का ?"
esakal September 11, 2025 06:45 AM
  • घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या खूप नाट्यमय बदल दिसत आहेत.

  • ऐश्वर्याने जानकीच्या आईचं अपहरण करून ऋषिकेशशी लग्नाची अट ठेवली आहे.

  • कथानक सतत बदलल्यामुळे प्रेक्षकांमध्ये असंतोष वाढला आहे.

  • Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली ही सध्या चर्चेत असलेली मालिका. सध्या या मालिकेत खूप ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. पण मालिकेतील कथानकाच्या बदलामुळे प्रेक्षक मात्र चिडले आहेत. काय घडलं आहे नेमकं जाणून घ्या.

    मालिकेत सध्या पाहायला मिळत आहे की, ऐश्वर्या जानकीच्या आईला किडनॅप करते. ती जानकीच्या आईला सोडण्याच्या बदल्यात ऋषिकेशशी लग्न करण्याची अट ठेवते. ऐश्वर्याचं कारस्थान उघड व्हावं म्हणून जानकी तयार होते. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

    प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, ऋषिकेश त्याची हळद झाल्यानंतर तिचं हळद जानकीला येऊन लावतो. ते दोघं बोलत असतानाच कुणीतरी व्यक्ती बघत असल्याचं जानकीला जाणवतं. ती व्यक्ती धमकी देणारी आहे हे ती ओळखते. ऋषिकेश त्या व्यक्तीला पकडण्यासाठी पळतो तेव्हाच त्याचा अपघात होतो.

    View this post on Instagram

    A post shared by मराठी Television Information (@marathitvinfo_official)

    प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र वैतागले आहेत. "बापरे केवढा मोठा accident झाला ","झालं आता ह्याची memory जाणार","किती ते फालतुगिरी चालू आहे काय माहित,अजब लेखक","झाल परत आता खूप सारे एपिसोड वाढले. उठाले रे बाबा मेरे को नही ऐ सिरियल बनाने वाले को","काय मालिका लांबवताय ऐश्वर्या पळून जाईल","बंद करा सिरीयल काय फालतूपणा आहे","मिस्टर लेखक दुसरं काही तुम्हाला सुचत नाही का " अशा कमेंट्स प्रेक्षकांनी करत त्यांचा वैताग व्यक्त केला.

    ऋषिकेशचा खरंच अपघात झाला असेल की हे नाटक असेल ? मालिकेत आता काय ट्विस्ट येणार ? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली 12 आणि 13 सप्टेंबरला संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

    FAQs :

    1. ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत सध्या काय घडतंय?
    ऐश्वर्याने जानकीच्या आईचं अपहरण केलं असून, जानकीला ऋषिकेशशी लग्नाची अट घातली आहे.

    2. जानकीने या परिस्थितीत काय निर्णय घेतला?
    ऐश्वर्याचं कारस्थान उघड व्हावं म्हणून ती तयार झाली आहे.

    3. प्रेक्षक चिडलेले का आहेत?
    कारण कथानक सतत वळणं घेत आहे आणि त्यात जास्त नकारात्मक ट्विस्ट दाखवले जात आहेत.

    4. मालिकेत मुख्य पात्र कोण आहेत?
    ऋषिकेश, जानकी आणि ऐश्वर्या हे कथानकातील प्रमुख पात्र आहेत.

    5. पुढे मालिकेत काय ट्विस्ट येऊ शकतो?
    जानकीच्या धाडसी निर्णयामुळे ऐश्वर्याचं कारस्थान उघडकीस येण्याची शक्यता आहे.

    1.14 लाखांचा दंड ! विमानात जाईचा गजरा घालून प्रवास करणं अभिनेत्रीला पडलं महागात
    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.