Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात
Saam TV September 11, 2025 08:45 AM

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांचे फोटो असलेले बॅनर फाडल्याची घटना काल शिर्डी शहरात उघडकीस आली होती. बॅनर फाडल्यासह परिसरातील दुचाकींची देखील तोडफोड करण्यात आली होती. या सगळ्या प्रकाराबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून फिर्याद देणारा तरुणानेच बॅनर फाडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.   

शिर्डीशहरातील लक्ष्मीनगर परिसरात गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वागत बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर फाडून तीन दुचाकींचे नुकसान करण्यात आले होते. हा प्रकार घडल्यानंतर शिर्डी शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. कोणी विरोधकाने हे कृत्य केले का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता. तर बॅनर फाडल्यावरून विखे यांचे समर्थक आक्रमक झाले होते. 

Satara Gadget: पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी खुशखबर, हैदराबादनंतर सातारा गॅझेट्ससाठी हालचालींना वेग

फिर्याद देणाराच निघाला आरोपी 

तर घटना उघडकीस आल्यानंतर विखे यांच्या समर्थकांनी शिर्डी पोलिसठाण्यात धाव घेत आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली होती. यात विशाल राजेश अहिरे या स्थानिक युवकाच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घटनेचा तपास केल्यानंतर फिर्यादीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. 

Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

फिर्यादीसह तीनजण ताब्यात 

शिर्डी पोलिसांनी विशाल राजेश अहिरे याच्यासह कृत्यात सहभागी असलेल्या त्याच्या इतर तीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. आपापसातील स्थानिक वादातून हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली असून फिर्यादीच आरोपी निघाल्याने हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे आणि त्यांच्या पथकाने अवघ्या काही तासातच घटनेचा तपास करत सत्य समोर आणले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.