Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे अपघातात मुलगा गेला; उल्हासनगरातील सरोज कुटुंबीयांची अवस्था बिकट, रेल्वेकडून घोषित मदतीची प्रतीक्षा
Saam TV September 11, 2025 08:45 AM

उल्हासनगर : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ साधारण चार महिन्यांपूर्वी म्हणजे ९ जून रोजी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यात उल्हासनगरमधील केतन सरोज याचा समावेश होता. अपघातातील मृतांना रेल्वेने मदतीची घोषणा केली होती. पण चार महिने उलटूनही सरोज कुटुंबाला आजतागायत मदत मिळालेली नाही. कुटूंबाचा कर्ता मुलगा एकूणच आधार गेल्याने कुटुंबाची अवस्था बिकट आहे. 

मुंब्रारेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात केतन सरोज याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात पाच जणांचे आयुष्य अंधारले आहे. रेल्वेकडून मदतीची फक्त आश्वासने मिळाली, पण अद्याप एकही रुपया किंवा नोकरी मिळाली नाही. आई- वडील, लहान भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्य आज रोजीरोटीच्या चिंतेत आहेत. घरचा आधार गेलेला आणि भविष्य काय होणार याची काळजी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. 

Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

आईच्या डोळ्यातले पाणी थांबेना 

आईसाठी मुलगा गमावण्यापेक्षा मोठं दुःख कोणतं असतं? केतनच्या आई संगीता सरोज यांच्या डोळ्यांतून वाहणारं पाणी त्यांची व्यथा सांगून जाते. माझा मुलगा गेला, आता आमच्या घरी कुणीही कमवणारा नाही. जर माझ्या मुलाला रेल्वेत नोकरी मिळाली; तर कुठेतरी आमच्या घराचा उदरनिर्वाह चालेल.” असं केतनची आई सांगते. 

Rahuri Rasta Roko : नगर- मनमाड महामार्ग रोखला; रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक

रेल्वेची मदत पोहचणार कधी 

माझ्या भावाच्या जाण्यानंतर आमच्या घराची परिस्थिती खूप बिकट झाली आहे. घरात कोणीही कमवणारा नाही. रेल्वेने ज्या मदतीची घोषणा केली होती, ती लवकर मिळावी हीच आमची अपेक्षा आहे.” असं केतनच्या भावाचं म्हणणं आहे. तर घरातील मुलगा गेल्याने त्याच्या कुटुंबाचे आयुष्य अजूनही अडचणीत आहे. दरम्यान रेल्वेने दिलेली आश्वासने कधी प्रत्यक्षात येतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.